नवी दिल्ली : भारतात विशेषतः महानगरांमध्ये भाड्याने घर किंवा मालमत्ता देण्याचा मोठा ट्रेंड असून यामुळे लोकांना चांगले उत्पन्नही मिळते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर ‘इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी’ अंतर्गत कर आकारला जातो. एखाद्या निवासी मालमत्तेतून भाडे घेत असलेल्या व्यक्तीवर किंवा इमारतीतील दुकान किंवा कारखान्याच्या इमारतीवरही कर आकारला जातो. तथापि हा कर अनेक सूट देऊन मोजला जातो.

तुम्ही योग्य नियोजन न केल्यार तुम्हाला भाड्याने मिळालेल्या उत्पन्नाचा मोठा भाग कराच्या स्वरूपात भरावे लागण्याची शक्यता आहे. परंतु लोकांनी घराच्या मालमत्तेमध्ये किंवा जमिनीत गुंतवणूक करावी आणि करातून थोडी सवलत मिळवावी यासाठी सरकारही काही सूटही देते. आयकर कायद्यानुसार ‘इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी’ हा कायदा भाड्याने कमाई करणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होतो. मात्र, अनेक प्रकरणात भाडे मिळत नसलेले पण मालमत्ता असलेल्या लोकांनाही त्यांची मालमत्ता जाहीर करणे भाग आहे.

ITR: अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणे आवश्यकच, पेमेंट नाही केल्यास लागेल ‘एवढे’ व्याज, जाणून घ्या
भाड्याने मिळणारे उत्पन्न म्हणजे काय?
तुम्हीपण एखाद्याला भाड्याने मालमत्ता दिली आहे आणि त्यातून मिळणारे उत्पन्न हाऊस प्रॉपर्टी इन्कम म्हणून गणले जाईल. विशेष म्हणजे हा नियम फक्त घर किंवा अपार्टमेंटला लागू होत नसून कार्यालयाची जागा, दुकान, इमारत संकुल इत्यादींच्या भाड्यातून मिळणारे उत्पन्नही या अंतर्गत मोजले जाते.

भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नाची गणना कशी होते?
भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नाची गणना करताना तुम्ही भरलेला म्युनिसिपल टॅक्स, तुम्हाला मिळणारी मानक वजावट आणि असल्यास मालमत्तेवरील कर्जाची रक्कम कट केली जाते. भाड्याने मिळणारे एकूण उत्पन्न हे तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न असते आणि या गणनेमध्ये मानक वजावट म्हणून ३०% कपात केली जाते.

​ITR भरताना खोटे क्लेम केले का? सावधान! आयकर विभागाकडून हजारो करदात्यांवर कारवाई
भाड्याच्या उत्पन्नातून कर बचत कशी करावी?
तुम्हाला भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नावर कर (इन्कम टॅक्स) बचत करायची असेल तर तुम्हाला गृहकर्जाच्या आधारावर सूट मिळू शकते. याशिवाय जर तुम्ही मालमत्तेचे संयुक्त मालक असल्यास कराचा बोजाही विभागला जाईल. तसेच स्टँडर्ड डिडक्शनचा दावा करून दायित्वाचा भार ३०% पर्यंत कमी करू शकता.

KBC 15: जसकरणने जिंकला 1 कोटींचा जॅकपॉट, पण स्पर्धकाच्या खात्यात नक्की किती रक्कम जमा होणार?
भाडे न घेताही कर भरावे लागणार
दुसरीकडे, आयकर कायद्यानुसार तुम्ही फक्त दोन मालमत्ता तुमच्या आवडत्या श्रेणीमध्ये ठेवू शकता. म्हणजे जर तुम्हाला या मालमत्तेचे भाडे मिळत नसेल तर कर दायित्व उद्भवणार नाही, परंतु जर तुमच्याकडे दोन पेक्षा जास्त मालमत्ता असेल तर त्या भाड्याच्या मालमत्ता म्हणून गणल्या जातील आणि अंदाजे भाड्यावर आधारित तुम्हाला टॅक्स भरावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here