कोची: केरळमधील एका चौकोनी कुटुंबानं आयुष्य संपवलं. इर्नाकुलमच्या वालिया कदमाक्कुडी परिसरातील राहत्या घरी त्यांचे मृतदेह सापडले. जोडप्यानं आधी मुलांना संपवून मग गळफास घेतला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. आर्थिक अडचणींना कंटाळून त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांच्या घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे.निजो (४०), त्याची पत्नी शिल्पा (३०), त्यांची मुलं अबेल (७) आणि ऍरॉन (५) अशी मृतांची नावं आहेत. ऑनलाईन लोन ऍपमुळे कुटुंबाचा शेवट झाल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. शिल्पानं ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं. मात्र कर्जाची परतफेड करण्यात तिला अपयश आलं. त्यानंतर त्यांना धमक्या येऊ लागल्या. ऍपसाठी काम करणाऱ्यांनी महिलेचे मॉर्फ केलेले फोटो तिच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवले. महिलेच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज सापडले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौघांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.निजोच्या आईनं आणि मैत्रिणीनं सर्वप्रथम चौघांचे मृतदेह पाहिले. निजो मोबाईल कॉलला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे निजोची आई त्याच्या घरी गेली. तिनं दार ठोठावलं. पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा आत निजो आणि त्याची पत्नी निपचित पडलेली दिसली. त्यांच्या मुलांचे मृतदेह दुसऱ्या खोलीत होते. निजोचं कुटुंब दोन मजली घरात राहातं. खालच्या मजल्यावर निजोचा धाकटा भाऊ आणि आई राहते. तर वरच्या मजल्यावर निजो त्याच्या पत्नी मुलांसह राहायचा.
Home Maharashtra चौकोनी कुटुंबानं जीवन संपवलं, मोबाईल तपासताच घटनेचा उलगडा; तुम्हा आम्हाला सावध करणारी...