वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाल्यापासून धोनी भारतीय संघातून खेळलेला नाही. त्याबद्दल गावस्कर म्हणतात की, कोण एवढा दीर्घकाळ भारतीय संघातून खेळण्यापासून दूर राहील? गेल्यावर्षी जुलैमध्ये भारताला न्यूझीलंडकडून वर्ल्डकप उपांत्य फेरीत हार सहन करावी लागली होती. त्यानंतर धोनी भारतीय संघातून खेळलेला नाही. टी-२० वर्ल्डकपच्या संघातून धोनी खेळेल का, या प्रश्नावर गावस्कर म्हणतात की, याचे उत्तर धोनीच देऊ शकेल. भारतातर्फे खेळण्यापासून कोण स्वतःला दूर ठेवेल?त्यामुळे याचे उत्तर या प्रश्नातच लपले आहे.
वाचा-
धोनी गेल्या वर्षी ९ जुलै रोजी भारताकडून खेळला होता. त्यानंतर तो प्रदीर्घ विश्रांतीवर आहे. धोनीच्या या विश्रांतीमुळे त्याच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चाना उधाण आले आहे. या वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुनरागमन करणार असल्याचे धोनीने सांगितले आहे.
चार दिवसांच्या कसोटीबद्दल म्हणाले..
आयसीसीकडून चार दिवसांच्या प्रस्तावाबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले, मला काय वाटते हे महत्त्वाचे नाही. खेळाडूंचे मत महत्त्वाचे आहे. यावर निर्णय घेण्याआधी सध्या खेळणाऱ्या खेळाडूंचे मत विचारात घ्यावे. बीसीसीआयने देखील क्रिकेटपटूंशी चर्चा करून निर्णय घ्यावा.
हे देखील वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times