सातारा : पुणे – बंगळूरु आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यात शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला. फुटलेला टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या आयशर ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात तीन ठार झाले असून मृतांची नावे अद्याप समजलेली नाहीत.

याबाबत घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे -बंगळुरू आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी हद्दीत बुधवारी रात्री आयशर (केए २२ एए १५४१) ट्रकने दुसऱ्या (केए ५३ सी ८३४३) ट्रकला जोरदार धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. रात्री पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने चालक टायर बदलत असल्याने ट्रक उभा होता. यावेळी पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने उभ्या ट्रकला जोराची धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस आणि शिरवळ रेस्क्यू टीम तात्काळ धटनास्थळ दाखल झाली.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या उपोषणाची सांगता; एकनाथ शिंदे कोंडी फोडण्यात यशस्वी
पोलीस, रेस्क्यू टीम आणि स्थानिकांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आयशर ट्रकच्या केबिनमध्ये चालकासह अन्य दोघेजण होते. अपघातात आयशर ट्रकची केबीन चेपल्याने तिघेही अडकले होते. या जखमींना बाहेर काढून शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी शिरवळ पोलिसांनी हलविले. मात्र, उपचारापूर्वी तिघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांची नावे अद्यापही समजलेली नाहीत.

या अपघातानंतर पुण्याला जाणारी वाहतूक काही काळ थांबली होती. सुमारे तासभरानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. शिरवळ पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.

पाकिस्तानने फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अर्धा संघ बदलला, POK मधील गरीब घरातील मुलगा श्रीलंकेशी भिडणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here