जालना : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी सलग १७ दिवस उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषणाची सांगता केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चार मंत्री जालन्यात पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करत मनोज जरांगे यांनी गुरुवारी सकाळी उपोषण सोडले. यानंतर एकनाथ शिंदेंनी उपस्थितांशी संवाद साधला. बोलताना त्यांनी व्हायरल झालेल्या ‘त्या’ कथित व्हिडिओवरही भाष्य केले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“मीडियाला देखील माझी विनंती आहे… की काल-परवा आमची एक पत्रकार परिषद झाली, त्यातला बरोबर तुम्ही शेंडा नि बुडखा काढला, आणि मधलं बरोबर दाखवलं. अरे असं करु नका. आमचा तुमच्यावर विश्वास आहे, खरं म्हणजे हा विश्वासघात झाला, आम्ही काय बोलत येत होतो.. आमची मीटिंग त्या दिवशी रात्री दीड वाजेपर्यंत चालली. त्या मीटिंगमधून आम्ही पत्रकार परिषदेला येत होतो. तेव्हा देवेंद्र फडणवीसजी म्हणाले, की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न नकोत, आणि मी म्हणालो की प्रश्न उत्तरं बिलकुल नकोत आणि पॉलिटिकल पण काही नको, जे आपलं आता मीटिंगमध्ये ठरलंय, तेवढंच बोलायचं आणि निघायचं. आता यांनी मागचं काढलं, पाठचं काढलं आणि मधलंच धरलं, मी असा माणूस आहे का हो? तुम्हाला फक्त काहीतरी आमिष दाखवायचं…” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“बोलून मोकळं व्हायचं अन्…” व्हिडिओवरुन विरोधकांची टीकेची झोड, एकनाथ शिंदेंचं उत्तर, आतापर्यंत काय घडलं?

शिंदे-फडणवीस अजित पवार यांच्यातील संवाद काय?

एकनाथ शिंदे – आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.
अजित पवार – हो… येस
देवेंद्र फडणवीस – माईक चालू आहे.

फडणवीसांच्या भावाच्या कंपनीतील सुपरवायझरवर हल्ला, शिंदे गटातील पदाधिकाऱ्यावर गुन्हा
मराठा आरक्षणासाठी सोमवारी रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी “बोलून मोकळं व्हायचं अन् निघून जायचं” अशा आशयाचं वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यावरुन विरोधीपक्षातील नेत्यांनी टीका केली होती. सरकार आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here