ठाणे : बांधकाम साहित्य पुरवणे आणि त्याचा आर्थिक व्यवहार यावरुन वाद झाल्याने पुरवठादार व त्याच्या साथीदारांनी ठेकेदार व कामगार यांना हॉकी स्टिकने बेदम मारहाण केला. ही घटना ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात घडली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात पुरवठादार संदीप तरे व त्याचे दहा साथीदार यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे संदीप तरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. तर हल्ला झालेला फिर्यादी हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस यांच्याशी संबंधित फर्मचा सुपरव्हायझर आहे.

राऊतांकडे नार्वेकरांची तक्रार, बबनराव घोलपांची नाराजी कायम, दोन दिवसांत निर्णय घेण्याचा इशारा
टिटवाळा येथील म्हसकळ गावात मंगळवारी ही मारहाणीची घटना घडली आहे. येथे कलश दर्शन गृह प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या गृह प्रकल्पासाठी बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम करण्यासाठी येथील ठेकेदाराने स्थानिक रहिवासी म्हणून संदीप तरे यांना बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम दिले आहे.

निवडणुकांसाठी आईसाहेब-वहिनीसाहेब सरसावल्या, मंगळागौरीत ‘राजकीय’ खेळ, महागड्या पारितोषिकांचा वर्षाव
तरे हे शिवसेना शिंदे गटाचे टिटवाळा उपविभाग प्रमुख असल्याची माहिती मिळत आहे. बांधकाम साहित्य पुरवण्यातील आर्थिक व्यवहारातून तरे आणि विकासकाचा ठेकेदार यांच्यात धुसफूस सुरू होती. ही धुसफूस वाढल्याने मंगळवारी पुरवठादार संदीप तरे आणि त्यांच्या १० समर्थकांनी म्हसकळ येथील कलश दर्शन प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन तेथील ठेकेदार आणि कामगारांना हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली.

नाशकातील राज ठाकरेंचा एकांडा शिलेदारही मनसेबाहेर, सर्वाधिक चर्चेतील पक्षाचा झेंडा हाती
या मारहाणीत ठेकेदारासह कामगार गंभीर जखमी झाले. या मारहाणीनंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. या प्रकल्पावरील ठेकेदाराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संदीप तरे यांच्यासह दहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पथक शोध घेत आहे.

CM म्हणाले बोलून मोकळं होऊ, निघून जाऊ, फडणवीस म्हणाले- माईक चालू आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here