मुंबई : मुंबई शहर वगळता, बृहन्मुंबई परिसरात लाखो नागरिक शेअर रिक्षामधून प्रवास करत असतात. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्याही मोठी असते. प्रवासादरम्यान काही अपराधी मनोवृत्तीचे पुरुष प्रवासी या संधीचा फायदा घेऊन विनयभंगाच्या व्याख्येत समाविष्ट होऊ शकेल अशा पद्धतीच्या कृती करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या अपराधिक कृतीविरोधात आणि समाजामध्ये महिला सन्मान व सुरक्षा वृद्धिंगत व्हावी, या हेतूने मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने #FOR_HER अभियान सुरू केले आहे.

या अभियानाअंतर्गत बृहन्मुंबई परिसरात ज्या ज्या ठिकाणी शेअर-ए-ऑटोरिक्षा चालविण्याच्या जागा आहेत, त्या त्या ठिकाणी युनियनचे कार्यकर्ते व पदाधिकारी शेअर रिक्षा स्टॅन्डवर महिला प्रवाश्यांसाठी स्वतंत्र रांग आखण्याचा प्रयत्न करत आहेत / करतील. जेणेकरून काही शेअर रिक्षांमध्ये फक्त महिला प्रवासीच प्रवास करू शकतील. त्यामुळे त्यांना प्रवासादरम्यान पुरूष सहप्रवाश्यांकडून कोणत्याही गैरप्रकाराला सामोरे जावे लागणार नाही.

लक्ष्मी लॉजमध्ये ‘तसले’ प्रकार सुरु, पोलिसांना खबर लागली, छाप्यात ७३ वर्षीय आरोपीसह दोघं अटकेत
एखाद्या महिलेला पुरूष सहप्रवाश्यांसोबत प्रवासादरम्यान अशा अनुचित प्रकाराचा अनुभव आला, अश्या प्रसंगी रिक्षाचालकांनी महिला प्रवाशाची घ्यावयाची काळजी, रिक्षाचालकाची दायित्व आणि पुरूष प्रवाशांची जबाबदारी याबाबत रिक्षाचालक आणि रिक्षा प्रवासी यांच्या सोबत प्रबोधनात्मक संवाद साधण्यात येत आहे. आता या अभियानात मोठ्या प्रमाणावर संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सभासद सहभागी होत असून, या अभियानाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येत आहे.

एकट्याने अश्लील व्हिडिओ पाहणं गुन्हा नाही, हायकोर्टाचं स्पष्ट मत, पण एखादा…
सदर अभियान यशस्वीपणे राबविले गेल्यास अश्या अपराधिक घटनांची संख्या कमी होईल, महिला सुरक्षा आणि महिलांचा सन्मान राखण्यासाठी या अभियानाचा हातभार लागेल अशी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनची धारणा आहे. परिवहन खात्याने या अभियानास सहकार्य करावे किंबहुना परिवहन खात्याने या अभियानात सहभागी व्हावे आणि त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाहीचे आदेश परिवहन खात्याला द्यावेत, अशी विनंती मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे.

टीव्ही स्क्रीन, पाणी, कॅमेरा, लॅंड लाइन फोन; रिक्षा आहे की मिनी बस; दिव्यांगांसाठी रिक्षाचालकाचा लाखोंचा खर्च

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here