नवी दिल्ली : शेअर बाजारात गुंतवणूक करून अनेक जण आपलं नशीब आजमावतात. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीतून अनेक पटींनी जास्त परतावा मिळवण्याची इच्छा असते. म्हणूनच तो अशा स्टॉकचा शोधात असतो ज्यामध्ये भविष्यात मल्टीबॅगर बनण्याची क्षमता असते. तुम्‍ही देखील मार्केटमध्‍ये कोणत्‍याही मल्‍टीबॅगर स्‍टॉक शोधात आहात जेणेकरून तुमची गुंतवणूक लवकरच दुप्पट होऊ शकेल? तसे असल्यास आता तुम्ही हे काम अगदी सहज करू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला एका फॉर्म्युलाबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही सहजपणे मल्टीबॅगर स्टॉक शोधू शकता.

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या बहुतेकांच्या मनात प्रश्न असतो की मार्केटमध्ये गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? मल्टीबॅगर स्टॉक कसा ओळखावा जेणेकरून गुंतवणुकीवर चांगला नफा मिळू शकेल.

शेअर बाजारात आज हे शेअर्स होऊ शकतात धडाम, लागणार विक्रीचा सपाटा; तुमच्याकडे आहेत का?
मल्टीबॅगर स्टॉक कसा ओळखायचा?
मल्टीबॅगर स्टॉकचा शोध घेण्याची अशी कोणती निश्चित पद्धत नाही ज्याचा अवलंब करून तुम्ही बाजारातील गुंतवणुकीवर नफा कमवू शकता. पण एक नियम आहे ज्याचे पालन करून स्टॉक तुम्हाला मल्टीबॅगर रिटर्न देईल की नाही हे सहज समजू शकता. भारतीय-अमेरिकन गुंतवणूकदार मोहनीश पाबराई, ज्यांनी वॉरेन बफेच्या गुंतवणुकीचा मार्ग अवलंबून बक्कळ पैसा कमावला, त्यांनी सांगितले की योग्य शेअर ओळखणे हे कोणत्याही गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

योग्य स्टॉक ओळखण्यासाठी २६ सूत्र काय?
शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे नशिबाचा खेळच. जर तुम्ही योग्य कंपनी आणि शेअर निवडला तर तुम्हाला नक्की परतावा मिळेल. २६ च्या सूत्राचा अवलंब करून तुम्ही योग्य स्टॉक ओळखू शकता. यामध्ये जो स्टॉक २६% किंवा त्याहून अधिक वार्षिक परतावा देत असेल तो तुमच्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक ठरू शकतो, म्हणजे इथे तुम्हाला जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे.

संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये कमाईची बंपर सधी; लिस्ट सेव्ह करा, होईल मजबूत फायदा
सोप्या शब्दात बोलायचे तर मल्टीबॅगर स्टॉक्स तुम्हाला १० वर्षांत दहापट, २० वर्षांत १०० पट आणि ३० वर्षांत १००० पट रिटर्न देऊ शकतात. दरम्यान, तुम्हाला गुंतवणुकीचे हे सूत्र सोप्या भाषेत समजले, तर तुम्हाला स्टॉकच्या चक्रवाढ वार्षिक वाढीवर लक्ष ठेवून राहावे लागेल. अशा परिस्थितीत कमीत कमी २६% परतावा देणारी कोणतीही गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

हा शेअर खरेदी करणाऱ्यांना कुबेर पावला… 10 वर्षात करोड रुपयात दिला परतावा, पुढे अजून सुसाट पैसा
शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉक्स
आयशर मोटर्स, MRF लिमिटेड, एशियन पेंट्स, पिडीलाइट इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्स हे मल्टीबॅगर स्टॉक्सची काही उदाहरणे असून या शेअर्सनी अनेक पट परतावा देत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. त्यामुळे वर नमूद केलेल्या गोष्टी देखील लक्षात ठेवल्या तर तुम्हाला देखील मल्टीबॅगर स्टॉक मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक धोक्याच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्ला घ्या. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन गुंतवणुकीचा कोणताही सल्ला देत नाही.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here