CBI arrests senior railway officer K C Joshi in Uttar Pradesh in Rs 3 lakh Bribery case seizes Rs 2 crore 61 lakh Cash; तीन लाखांची लाच, वरिष्ठ रेल्वे अधिकारी केसी जोशींना रंगेहाथ अटक, घरात अडीच कोटींचं घबाड
लखनौ : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने ईशान्य रेल्वेचे (गोरखपूर) वरिष्ठ अधिकारी के सी जोशी यांना अटक केली. कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी, तसेच कंपनीची सरकारी नोंदणी आणि नुकताच केलेला करार रद्द करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कारवाई केली. सीबीआयने जोशीच्या गोरखपूर आणि नोएडा येथील निवासस्थानांवरही छापे टाकले. तिथून २.६१ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. “ईशान्य रेल्वे, गोरखपूरचे प्रधान मुख्य साहित्य अधिकारी के सी जोशी यांना मंगळवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कॉन्ट्रॅक्टरने सीबीआयकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. ईशान्य रेल्वेला सेवा आणि विविध उत्पादनांची विक्री करणाऱ्या फिर्यादीच्या फर्मला नुकतेच दरमहा ८० हजार रुपये प्रति ट्रक या दराने कंत्राटी तत्त्वावर तीन ट्रकद्वारे प्रदान करण्याचे कंत्राट मिळाले होते” अशी माहिती सीबीआयच्या प्रवक्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
Bademiya: खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवणाऱ्या ‘बडेमियाँ’त किळसवाणा प्रकार, FDA ने ठोकलं टाळं तक्रारकर्त्याने आरोप केला आहे की, केसी जोशी यांनी त्याच्याकडे सात लाख रुपयांची लाच मागितली होती, ती न दिल्यास त्याच्या कंपनीची सरकारी ई-मार्केटप्लेस पोर्टलवरील नोंदणी तसेच नुकतेच मिळालेले करार रद्द करण्याची धमकी दिली होती. केसी जोशी हे १९८८ च्या बॅचचे इंडियन रेल्वे स्टोअर्स सर्व्हिस (IRSS) अधिकारी आहेत.
लक्ष्मी लॉजमध्ये ‘तसले’ प्रकार सुरु, पोलिसांना खबर लागली, छाप्यात ७३ वर्षीय आरोपीसह दोघं अटकेत सीबीआयने सापळा रचून केसी जोशींना लाच घेताना रंगेहाथ पकडले आणि त्याच्या दोन निवासस्थानांवर छापे टाकून २.६१ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. सीबीआयने जोशी यांचा संगणक आणि हार्ड डिस्क ताब्यात घेतली आहे. एक टीम अजूनही गोरखपूरमध्ये तळ ठोकून आहे. बुधवारी सीबीआयने केसी जोशी यांना लखनौला आणले. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. सीबीआय जोशींची कोठडी मागण्याची तयारी करत आहे. जोशी यांनी सीबीआयच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
विकास कामांच्या फाईल सोबत कोंबडा हवा; महापालिकेच्या अधिकाऱ्याची नगरसेवकाकडे अजब मागणी