मुंबई: बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. लोकप्रिय अभिनेते झाले. त्यांनी विविध सिनेमा-सीरिजमध्ये सहाय्यक भूमिका साकारली आहे. ‘दिल चाहता है’, ‘चक दे इंडिया’ आणि ‘हॅपी न्यू इयर’सारख्या अनेक सिनेमांमध्ये काम करत त्यांनी अभिनयाची छाप सोडली होती. शिवाय अलीकडेच त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध सीरिजमध्येही काम केले आहे. दरम्यान अभिनेत्याचे मित्र फैजल मलिक यांनी या दुःखद घटनेबद्दल सांगिताना माहिती दिली की, रिओ कपाडिया यांनी गुरुवारी, १३ सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. कपाडिया शेवटचे ऑगस्ट २०२३ मध्ये आलेली झोया अख्तरची वेब सीरिज ‘मेड इन हेवन २’ मध्ये दिसले होते. १५ सप्टेंबर रोजी होणार अंत्यसंस्कार६६ वर्षीय कपाडिया यांच्या कुटुंबाने या दुःखद घटनेवर एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी सांगितले की, अभिनेत्याने गुरुवारी दुपारी १२.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. ८ जून १९५७ रोजी जन्मलेल्या रिओ यांच्या पत्नीचे नाव मारिया असून त्यांना दोन मुले आहेत. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अभिनेत्याच्या पार्थिवावर गोरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. रिओ शेवटचे झोया अख्तरच्या ‘मेड इन हेवन २’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसले होते. ही सीरिज गेल्याच महिन्यात प्रदर्शित झाली होती असून त्यांनी यामध्ये ‘केशव आर्य’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. यापूर्वी तो हॉट स्टारच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये सीपी संदीप रॉयच्या भूमिकेत दिसले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here