सध्या बाजारात जवळपास सर्वच बँका त्यांच्या ग्राहकांना कार कर्ज देतात, पण कार लोन किती घ्यायचे याबाबत लोकांमध्ये गोंधळ असतो. डाउन पेमेंट किती असावे, कार्यकाळ किती असावा असे प्रश्न मनात राहतात, त्यामुळे आज आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
कार खरेदीसाठी 20/4/10 नियम उपयुक्त ठरेल
पैशाशी संबंधित व्यवहारांमध्ये आर्थिक तज्ञांनी बनवलेले काही नियम खूप लोकप्रिय असून कार खरेदी करतानाही असाच एक नियम आहे जो 20/4/10 नियम किंवा सूत्र आहे. तुमची आवडती कार खरेदी करणे योग्य आहे की नाही किंवा गाडी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही अतिरिक्त काही करायचे की नाही हे देखील हा नियम तुम्हाला सांगेल.
कार खरेदीचे 20/4/10 सूत्र काय आहे?
- गाडी खरेदी करताना तुम्ही २०% किंवा त्याहून अधिक डाउन पेमेंट करण्याचे प्रयत्न करा. नियमानुसार कार लोन घेताना ग्राहकाने किमान २०% रक्कम डाउन पेमेंट भरले पाहिजे.
- तुम्ही चार वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी कार लोन घ्या.
- तुमचा एकूण वाहतूक खर्च (कार EMI सह) तुमच्या मासिक पगाराच्या १०% पेक्षा कमी असावा. EMI व्यतिरिक्त वाहतूक खर्चामध्ये इंधन आणि देखभाल (मेंटेनन्स) खर्चाचा देखील समावेश आहे.
या टिप्समुळे सूत्राचे पालन करणे सहज होईल
- शक्य तितकं जास्त डाऊन पेमेंट करा
- अपग्रेडेड मॉडेल खरेदी करण्याऐवजी कारचे बेस मॉडेल खरेदी करा.
- गेल्या वर्षीच्या उरलेल्या नवीन कार इन्व्हेंटरीचा विचार करा.
- नवीन गाडी घेण्याऐवजी वापरलेली कार खरेदी करा
- तुमची सध्याची कार जास्त वेळ वापर आणि नवीन कारसाठी बचत करा.