भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत खासदार नारायण राणे यांनी हा आरोप केला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी, आमदार नितेश राणे उपस्थित होते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीतून बरंच काही बाहेर येत आहे. त्यामुळे त्यावरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठीच दुबईतून धमकी आल्याचा कांगावा केला जात आहे. कोठून दूरध्वनी आला हे तपासणारी अत्याधुनिक यंत्रणा मुंबई पोलिसांकडे आहे. त्याचा वापर करून कोठून दूरध्वनी आला व कोणी दूरध्वनी केला हे सहज कळू शकते. तसा तपास करा आणि कुणाचा दूरध्वनी आला हे जाहीर करा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. तसेच सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी राज्य सरकारने नामांकित वकील नियुक्त करायला हवे होते. मात्र सरकारने नात्यागोत्यातले साधे वकील नेमले. या वकिलांना राज्य सरकारची मराठा आरक्षणाबाबतची बाजू न्यायालयात व्यवस्थित मांडता आली नाही, त्यामुळेच आरक्षणाला स्थगिती मिळाली असा आरोपही त्यांनी केला.
करोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारच्या या अपयशाचा पाढा वाचला आहे. फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. दोन दिवसाच्या अधिवेशनात सत्तारूढ पक्षाच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातल्याने अनेक विधेयके चर्चेविनाच मंजूर केली गेली, असंही ते म्हणाले.
अभिनेत्री कंगना राणावत हिने काही आक्षेपार्ह भाषा वापरली असेल तर तिच्याविरुद्ध कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचे मार्ग मोकळे आहेत. मात्र ते न करता तिच्याबाबत अपमानास्पद भाषा वापरली जाते असून हे दुर्देवी आहे, असंही ते म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times