गेल्या काही दिवसांपासून सरकारी कंपनी आयटीआय लिमिटेडच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली असून कंपनीचे शेअर्स गुरुवारी ७ टक्क्यांहून अधिक उसळी घेत २१३.३० रुपयांवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे कंपनीच्या शेअर्समध्ये मागील चार दिवसात ७१ टक्के वाढ झाली आहे. ITI लिमिटेडच्या शेअर्समध्ये ही वाढ त्या घोषणेनंतर झाली आहे ज्यात कंपनीने म्हटले आहे की त्यांनी बाजारात स्व-मालकीचे ब्रँडेड लॅपटॉप आणि मायक्रो पीसी विकसित केले आहेत, जे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि कामगिरीच्या बरोबरीने आहेत.
कंपनीचे शेअर्स २५ वर्षांपेक्षा जास्त उंचीवर
ITI लिमिटेडचे शेअर्स २५ वर्षांहून अधिक काळातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सने फेब्रुवारी १९९४ नंतरची सर्वोच्च पातळी गाठली आहे. यापूर्वी ११ जानेवारी १९९४ रोजी कंपनीचे शेअर्स २७५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होते. या सरकारी कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ८६.५० रुपये असून ITI लिमिटेडचे बाजार भांडवल १८,८८१ कोटी आहे.
कंपनीने मिळवल्या अनेक निविदा
आयटीआय लिमिटेडने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले की त्यांनी बाजारात आपली नवीन ब्रँडेड उत्पादने ‘SMAASH’ लाँच केले असून कंपनीने अनेक निविदा मिळवल्या आहेत. आयटीआय लिमिटेडने इंटेलच्या सहकार्याने दोन्ही उत्पादनांची रचना केली आहे. याशिवाय सरकारी कंपनीने इंटेलसोबत डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी सामंजस्य करार केला आहे. उत्पादित उत्पादने इंटेलच्या i3, i5, i7 आणि इतर मायक्रोप्रोसेसर मालिकेद्वारे समर्थित आहेत.
(Disclimer: इथे फक्त शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती दिली आहे, तो गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)