म. टा. प्रतिनिधी, पुणे : विविध योजनांसाठीचे खोदकाम आणि रस्त्यांची डागडुजी वेळेत न झाल्याने यंदा कमी पाऊस होऊनही शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रस्ते पूर्ववत करण्यासाठी महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या मलमपट्टीमुळे खड्डे बुजणे तर दूरच; पण रस्तेही समपातळीवर राहात नाहीत. रस्त्यांचे संपूर्ण पुनर्डांबरीकरण पावसाळ्यानंतरच केले जाणार असल्याने तोपर्यंत खड्ड्यांतून वाहने चालवून पुणेकरांचे कंबरडे मात्र मोडणार आहे.

खड्डे बुजविण्यासाठी पथ विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, वस्तुस्थिती त्यापेक्षा वेगळी आहे. खड्ड्यांची माहिती कळविण्यासाठी पालिकेने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला. या हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारींपैकी बहुतांश खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा शहरात फिरल्यानंतर फोल ठरल्याचे दिसून येते. आदर पूनावाला यांच्यातर्फे ‘सीएसआर’ अंतर्गत महापालिकेच्या हद्दीतील खड्डे बुजवून दिले जातात. या कालावधीत पूनावालांनी ४,८९८ खड्डे बुजवले.

एक जून ते १३ सप्टेंबरपर्यंतची कार्यवाही
१५९०३.९९ चौरस मीटर
महापालिकेने केलेले डांबरीकरण.
८,६६४
खड्ड्यांची पालिकेला मिळाली माहिती
८,१९५
खड्डे दुरुस्तीची पालिकेचा दावा
४६९
खड्डे बुजविणे बाकी
३६०
चेंबरची झाकणे समपातळीत

परिसर : सिंहगड रस्ता
डांबरीकरण (चौ.मी.) : ४,७३२

एकूण खड्डे : ६७९
दुरुस्त खड्डे : ५६०
शिल्लक खड्डे : ११९
चेंबर दुरुस्ती : ६९
पाणी साचलेली ठिकाणे : ९

परिसर : कोंढवा, येवलेवाडी, कात्रज
डांबरीकरण (चौ.मी.) : २,८३५
एकूण खड्डे : ५५२
दुरुस्त खड्डे : ४९९
शिल्लक खड्डे : ५३
चेंबर दुरुस्ती : ६१
पाणी साचलेली ठिकाणे : २

परिसर : नगर रस्ता, खराडी
डांबरीकरण (चौ.मी.) : १०३३.६८
एकूण खड्डे : २९७
दुरुस्त खड्डे : २७६
शिल्लक खड्डे : २१
चेंबर दुरुस्ती : ५२
पाणी साचलेली ठिकाणे : १३

परिसर : हडपसर, मुंढवा
डांबरीकरण (चौ.मी.) : १७९१

एकूण खड्डे : ६०७
दुरुस्त खड्डे : ५६५
शिल्लक खड्डे : १६
चेंबर दुरुस्ती : ५८
पाणी साचलेली ठिकाणे : ११

परिसर : मध्यवर्ती पेठा
डांबरीकरण (चौ.मी.) : ३१६७

एकूण खड्डे : ७३३
दुरुस्त खड्डे : ५९२
शिल्लक खड्डे : १६८
चेंबर दुरुस्ती : ३७
पाणी साचलेली ठिकाणे : २०

परिसर : कोथरूड, कर्वेनगर, वारजे
डांबरीकरण (चौ.मी.) : ८१७

एकूण खड्डे : ४६२
दुरुस्त खड्डे : ३८२
शिल्लक खड्डे : ८०
चेंबर दुरुस्ती : २०
पाणी साचलेली ठिकाणे : ३

परिसर : औंध, बाणेर, बालेवाडी, शिवाजीनगर
डांबरीकरण (चौ.मी.) : १६१७.९

एकूण खड्डे : ४३०
दुरुस्त खड्डे : ४१८
शिल्लक खड्डे : १२
चेंबर दुरुस्ती : ४७
पाणी साचलेली ठिकाणे : ६

खड्डे बुजविण्याचे तंत्र

– हॉटमिक्स : डांबर वितळवून त्यात खडी मिसळून रस्ता तयार केला जातो किंवा खड्डा बुजवला जातो. या कालावधीत महापालिकेने येरवडा येथे उभारलेल्या हॉटमिक्स प्लांटमधील २९,४२२.७ टन डांबर वापरण्यात आले.

– कोल्डमिक्स : इमल्शन आणि खडी एकत्र करून खड्डे बुजवले जातात. विशेषत: पावसाळ्यात किंवा भर पावसात खड्डे कोल्डमिक्सद्वारे बुजवले जातात. या काळात कोल्डमिक्सच्या ४,७४९ बॅगचा वापर केला गेला.

कोल्डमिक्स, हॉटमिक्स; तसेच पेव्हिंग आणि सिमेंट ब्लॉक वापरून खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात येत आहेत. पावसाळ्यानंतर रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण केले जाईल. पॅकेजअंतर्गत रस्त्यांचे कामही सुरू आहे.- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; एसटीमध्येच महिलेची प्रसूती, चालक वाहकाच्या प्रसंगवधानाने वाचले प्राण
खड्ड्यांची माहिती कळवा…

– क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आढळलेल्या खड्ड्यांची माहिती पथ विभागाला देतात. याशिवाय नागरिकांना खड्ड्यांची माहिती कळवता यावी, यासाठी दोन संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. खड्ड्यांच्या तक्रारीसाठी कार्यालयीन वेळेत ०२०-२५५०१०८३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
– भरारी पथकाशी (रविवार वगळता) ९०४९२७१००३ या क्रमांकावर २४ तास संपर्क साधता येईल. मोबाइल क्रमांकावर फोटो, व्हिडिओद्वारेही माहिती पाठवता येते.
– ‘पीएमसी केअर अॅप’ आणि ‘एक्स’ हँडलद्वारेही खड्ड्यांच्या तक्रारींवर पथ विभागाकडून कार्यवाही केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here