पुणे : वाहन परवाना (लायसन्स) काढल्यानंतर त्याचे स्मार्ट कार्डवर केले जाणारे प्रिंटिंग अडीच महिन्यांपासून रखडल्याने राज्यात तब्बल सात लाखांहून अधिक लायसन्सचे प्रिटिंग रखडले आहे. नवीन कंपनीने कंत्राट मिळाल्यापासून नुकतेच लायसन्स प्रिंटिंग सुरू केले आहे. परंतु तत्पूर्वीच्या अडीच महिन्यांतील लायसन्स प्रिंटिंग कोणी करायचे, याचा तोडगा अद्याप परिवहन विभागाला काढता आलेला नाही. त्याचा फटका नागरिकांना बसत असून, परीक्षेत उत्तीर्ण होऊनही लायसन्सविनाच गाडी चालवावी लागते आहे.

राज्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयात पूर्वी लायसन्स व वाहन नोंदणी क्रमांक (आरसी) प्रिंटिंग केले जात होते. त्या कंपनीचे कंत्राट मे २०२३ अखेरला संपले. परिवहन विभागाने एका नवीन कंपनीला आरसी व लायसन्स प्रिंटिंग करण्याचे कंत्राट दिले आहे. या कंपनीने नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई या तीन ठिकाणांहून २१ ऑगस्टपासून लायसन्स व ‘आरसी’चे प्रिंटिंग सुरू केले. २१ ऑगस्टनंतरची लायसन्स नागरिकांना पोस्टाने तत्काळ मिळू लागली आहेत. कंपनीचे कंत्राट संपलेल्या काळात लायसन्स व ‘आरसी’चे प्रिंटिंग रखडले आहे. या अडीच महिन्यांच्या काळात राज्यात सात लाखांच्याजवळ लायसन्स काढण्यात आली आहेत. जुन्याबरोबरच नवीन कंपनीनेही हे प्रिंटिंग करण्यासाठी हात वर केले आहेत. त्यामुळे नागरिकांना लायसन्स काढूनही ती मिळत नाहीत. त्यामुळे रस्त्यामध्ये वाहतूक पोलिसांनी पकडल्यानंतर नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

पुण्यातील ७३ हजार लायसन्स प्रलंबित

लायसन्सची छपाई बंद असलेल्या काळात पुण्यातील ७३ लायसन्सचे प्रिंटिंग प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये नवीन लायसन्सची संख्या २० हजार; तर लायसन्स नूतनीकरण, नाव, पत्ता बदल अशी ५३ हजार लायसन्स आहेत.

प्रिंटिंग प्रलंबित असलेली लायसन्स व ‘आरसी’ची छपाई नवीन कंपनीलाच करावी लागणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. ही छपाई सुरू केल्यानंतर काही दिवसांमध्ये प्रलंबित लायसन्स नागरिकांना मिळतील.

– संजीव भोर, आरटीओ, पुणे

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या आणि न पाळणाऱ्या दोघांचंही स्वागत; पोलिसांचा नवा अंदाज

लायसन्स प्रिंटिंगला उशीर होत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे वाहतूक विभागानेही अशा वाहन चालकांवर कारवाई करू नये. डीजी लॉकरमधील वाहन परवाना वाहतूक पोलिस स्वीकारत नाहीत.

– अनुज शिंदे, मोटार ड्राईव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन

६,९३,६८५

एक जून ते २१ ऑगस्ट दरम्यान राज्यात काढलेलेलायसन्स

२,५६,५५२

पक्क्या लायसन्सची संख्या

४,३७,१३३

लायसन्सचे नूतनीकरण

७३,२१२

पुण्यात एक जून ते २१ ऑगस्ट दरम्यान काढलेली लायसन्स

पुणेकरांचे कंबरडे मोडण्याची परफेक्ट सोय; खड्डे बुजवण्याचे पालिकेचे दावे फोल, रस्त्यांची अक्षरश: चाळण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here