पगारदारांसाठीही असो का ॲडव्हान्स टॅक्स?नोकरदार कर्मचारी, स्वयंरोजगार किंवा व्यवसाय मालक आणि ट्रस्ट चालवणाऱ्यांना आगाऊ कर भरावा लागतो. आगाऊ कर हप्त्यांमध्ये भरला तरी त्याची गणना वर्षाच्या हिशोबाने होते. तुम्हाला एका वर्षात किती कर भरावा लागेल हे मोजावे लागेल. तुमच्या उत्पादनातील डिडक्शन कापून तुम्ही तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार उर्वरित उत्पन्नावर कर मोजू शकता. यानंतर तुम्हाला १५ जूनला तुमच्या आगाऊ कराच्या किमान १५% रक्कम भरावी लागेल. तर ४५% आगाऊ कर १५ सप्टेंबरपर्यंत, ७५% कर १५ डिसेंबरपर्यंत आणि १००% ॲडव्हान्स टॅक्स १५ मार्चपर्यंत भरणे बंधनकारक आहे.
आगाऊ (ॲडव्हान्स टॅक्स) कर म्हणजे काय?
ॲडव्हान्स टॅक्स हा आयकराचा एक प्रकार आहे, जो आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी आयकर विभागाकडे जमा करावा लागतो. हे सामान्य कराप्रमाणे वार्षिक आधारावर एकरकमी भरले जात नसून हप्त्यांमध्ये जमा केले जाते. या अंतर्गत करदाते आयकर विभागाकडे आगाऊ कर जमा करतात.
कर दायित्व १० हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या करदात्यांना आगाऊ कर भरणे आवश्यक असून नोकरदार लोक, फ्रीलांसर, व्यापारी आणि इतर मार्गाने पैसे कमवणाऱ्या लोकांनाही लागू होतो. तथापि, तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असल्यास जे कोणत्याही प्रकारचे व्यवसाय करत नाहीत त्यांना आगाऊ करातून सूट देण्यात आली आहे.
आगाऊ कर भरला नाही तर काय?
नोकरदार लोकांच्या अनेकदा बदलण्याच्या बाबतीत TDS अनेकदा कंपन्यांकडून योग्यरित्या कापला जात नाही आणि आगाऊ कर दायित्व तयार केले जाते. अशा परिस्थितीत तुम्हाला आगाऊ कर तपासावा लागेल आणि जमा करावा लागेल नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल आणि व्याज देखील भरावे लागेल. करदात्याने आगाऊ कर न भरल्यास कलम २३४बी आणि २३४सी अंतर्गत भरलेल्या रकमेवर १% दंड भरावा लागेल.