स्टॉकहोम: आजकाल लोक पैशांसाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. याची अनेक उदाहरणं आपण रोज बघत असतो. एका व्यक्तीनेही असंच काही केलं आहे. त्याने पैशांसाठी पाच वर्ष एका मृतदेहासोबत काढले आणि तो मृतदेह त्याच्या पत्नीचा होता. पत्नीच्या मृत्यूनंतर पेन्शन बंद होऊ नये म्हणून पतीने सुमारे पाच वर्षे तिचा मृतदेह फ्रीजरमध्ये सुरक्षित ठेवला. आता या कृत्यासाठी त्याला कठोर शिक्षा झाली आहे.

स्वीडिश न्यायालयाने ५७ वर्षीय नॉर्वेजियन व्यक्तीला फसवणूक आणि रेकॉर्डमध्ये अफरातफर केल्याबद्दल ३.५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे त्यांनी पत्नीचा मृतदेह पाच वर्षे घरातच जपून ठेवला असून कोणालाही त्याची कल्पना नव्हती. या पाच वर्षांत, ते नेहमी आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना बहाणे सांगून टाळाटाळ करायचे, ते सांगायचे की त्यांची पत्नी झोपली आहे, तर कधी पत्नी घरी आहे.

Girlfriend Murder: नयनाचा जीव घ्यायचा नव्हता, पण.. मनोहरने बायकोला फोन केल्यावर काय सांगितलं?
खरं तर २०१८ मध्ये आरोपीच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. आरोपीने पत्नीचा मृतदेह पुरण्याऐवजी तो ज्या फ्रीजरमध्ये अन्न ठेवायचा त्याच फ्रीजरमध्ये ठेवला. या काळात त्याला पेन्शन आणि कर सवलत मिळत राहिली, ती एकूण १.२ दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर म्हणजेच ९२ लाख ९६ हजार ४२४ रुपयांपेक्षा जास्त होती.

आरोपीच्या पत्नीशी अनेक वर्षे संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पतीची चौकशी केली असता, आरोपीने पत्नीचा मृत्यू लपवल्याची कबुली दिली. इतकंच नाही तर तिचा मृत्यू झाल्याचं कळाल्यानंतर आपण तिचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवल्याचं सांगितलं. आता या व्यक्तीला नागरी स्वातंत्र्यांचे उल्लंघन, फसवणूक, मृतदेहाची विटंबना आणि कागदपत्रांची अफरातफर करण्याच्या आरोपांवरून दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने त्याना साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

कलेक्टरची हत्या केली, तुरुंगात राहून खासदार झाला, सुटकेसाठी कायदाच बदलला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here