मुंबई :‘उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना टरबूज म्हणाले; पण आमचे देवेंद्र देखणे आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात आले नाहीत आणि आता महाराष्ट्र दौरे काढत आहेत. मात्र उद्धव ठाकरे जिथे दौरे काढतील तिथे जाणार असून त्याचे मी पंचनामे करणार आहे. लंडनला काय आहे, हे योग्य वेळ आली की दाखवणार आहे’ अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला.

‘राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे दाखले द्यावेत, ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत,’ अशी मागणी नारायण राणे यांनी गुरुवारी येथे केली.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी कारमधून ‘ते’ दृश्य पाहिलं, आयुक्तांकडे नाराजी व्यक्त करताच BMC लागली कामाला
मराठा समाजाला आरक्षण देताना राज्य घटनेतील कलम १५ (४) आणि कलम १६चा (४) अभ्यास करण्यात यावा, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे,’ असा सल्लाही राणे यांनी सरकारला दिला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी जालना येथे नुकतेच उपोषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. आपले उपोषण सोडताना जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी केली आहे. राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या मागणीला विरोध केला. सरसकट कुणबी जातीचे दाखले द्यावेत ही ९६ कुळी मराठा समाजाची मागणी नाही, असा दावा त्यांनी केला.

मराठा समाजाला मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतील ४०० जातींवर अन्याय करणार का? तायवडेंचा सवाल
‘मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी ही अनेक वर्षे जुनी आहे. यापूर्वी मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र यावर कोर्टकचेऱ्या झाल्या, आक्षेप घेण्यात आले आणि ते आरक्षण रद्द झाले. राज्यात ३८ टक्के मराठा समाज आहे. या समाजाचे सर्वेक्षण व्हावे आणि सामाजिक, आर्थिक तसेच शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर या समाजाला आरक्षण मिळावे. पैशांअभावी ज्यांना शैक्षणिक पात्रता मिळवता आली नाही, अशांना आरक्षण दिले गेले पाहिजे. मात्र कुणाचेही आरक्षण काढून त्यांना द्यावे, या मताचा मी नाही,’ असेही राणे यांनी स्पष्ट केले.

कीर्तिकरांनी शिंदेंना खोका दिला, मी वाकून पाहिलं; राणेंच्या वाक्यानं सारेच हसले

राज्य सरकारचा अधिकार

‘घटनेतील तरतुदीप्रमाणे आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. ज्यांचा सामाजिक, आरक्षण आणि इतिहासावर अभ्यास आहे अशाच लोकांनी आरक्षणावर बोलावे,’ असा टोला त्यांनी लगावला. ‘यापूर्वी अन्य घटकांना आरक्षण देण्यात आले, तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते. मराठ्यांनी कधी कुणाला आरक्षण देताना द्वेष केला नाही, त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या वेळीही द्वेषाची भावना असू नये,’ असेही नारायण राणे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here