नवी दिल्ली : मागच्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं, पण आज शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या भावामध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. अशा प्रकारे आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे वायदे आता ५८ हजार ७०० रुपये तर चांदीचे वायदे ७१ हजार ५०० रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीचे फ्युचर्समध्ये तेजी नोंदवली गेली आहे.

Tax on Rental Income: रेंटमधून होतेय कमाई तर द्यावा लागेल कर, पण टॅक्स वाचवायचा असेल तर ‘असं’ करा नियोजन
सोने-चांदीचा भाव वाढला
MCX वर आज सोन्याचा भाव ५८ हजार ६७४ रुपये प्रति १० ग्रॅम वर किंचित वाढीसह उघडला आणि सकाळीच्या ९ च्या सुमारास ५८ हजार ७२४ इंट्राडे उच्चांक आणि ५८ हजार ६७३ रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला. सध्या MCX वर ऑक्टोबर सोन्याचे वायदे ०.१७% वाढीसह ५८ हजार ६८९ प्रति १० ग्रॅमवर ट्रेड करत आहेत. दुसरीकडे, आज चांदीचा भाव MCX वर किंचित वाढून ७१ हजार ७५० प्रति किलोवर उघडला. तर डिसेंबर MCX वर चांदीचा भाव ०.७२$ वाढून ७१ हजार ४९४ रुपये प्रति किलोवर पोहोचला.

जितकी सॅलरी तितकीच अतिरिक्त इन्कम… कसं? जाणून घ्या कमाईचा सिक्रेट फॉर्म्युला
सराफा बाजारात सोन्या-चांदीची चमक वाढली
त्याचवेळी देशांतर्गत सराफा बाजारात देखील सोन्या-चांदीची चमक वाढल्याचे दिसून आले आहे. गुडरिटर्न्सनुसार भारतात सोने किमान २०० रुपये महागले तर चांदीचा भाव ५०० रुपयांनी वाढला आहे. अशाप्रकारे आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोने ५४ हजार ७०० रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना ५९ हजार ६७० रुपये मोजावे लागतील. तर चांदीचा भाव वाढीसह पुन्हा एकदा ७४ हजारांवर आला आहे.

या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते

सोन्याच्या किंमतीत उलथापालथ सुरूच
यावर्षीच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठा चढउतार होत असून मे महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली होती. मात्र त्यांनतर जून आणि जुलै महिन्यात पडझड सुरूच राहिली तर, ऑगस्ट महिन्यात धातूंच्या किंमतीत संमिश्र कल दिसून आला. अशा परिस्थितीत आता आगामी सणांच्या काळात सोने आणि चांदीचा दर उसळी घेणार का? याकडे ग्राहकांचे लक्ष लागून असेल.

छोट्या सेल्समनपासून बनले देशातील सर्वात मोठे उद्योगपती, सरकारशी नडले अन् घात झाला
जागतिक बाजारात सोन्या-चांदीत चढउतार
डॉलर आणि रोखे उत्पन्नाच्या जोरावर सोने-चांदीच्या भावात घसरण होत होती, मात्र चीनकडून मिळालेल्या मजबूत संकेतांमुळे सराफा बाजारात उत्साह संचारला आहे. कोमेक्सवर सोन्याची किंमत $१९४० च्या जवळ पोहोचली असताना चांदीचा भावही प्रति औंस २३.१० डॉलरवर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here