पुन्हा गेल्या वर्षासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांची आणि पोलिसांची बैठक झाली होती. त्यामध्ये मंडप उभारू नका असं सांगण्यात आलं होतं.
प्रभादेवी परिसरात मनसेने काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यानंतर सदा सरवणकर यांनी आमदार झाल्यानंतर या मंडपासमोर गणेशोत्सवाला सुरुवात केली. शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटानेही इथे मंडप उभारला. गणपती विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात ठाकरे गटाकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला. या मंचाच्या शेजारीच शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला. यावेळी दोन्ही गटांत आधी शाब्दिक चकमक उडाली. आणि मध्यरात्री या वादाचे रुपांतर राड्यात झाले
दरम्यान, यंदा पुन्हा तिन्ही पक्षांनी गणेशोत्सव काळात मंडप उभारण्यासाठी परवानगीची पत्रं पोलिसांना दिली. परंतु गेल्या वर्षी घडलेला प्रकार लक्षात घेता पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत तिन्ही पक्षांना मंडप उभारण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे तिन्ही पक्षांना आता पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागत आहे.