स्पेनमध्ये लाइव्ह रिपोर्टिंग करताना एका व्यक्तीने त्या महिला रिपोर्टरला असभ्यने स्पर्श केला. या कारवाईनंतर आता तो तुरुंगात आहे. १२ सप्टेंबर रोजी पत्रकार इसा बालाडो माद्रिदमध्ये दरोड्याच्या घटनेचे रिपोर्टिंग करत असताना ही घटना घडली. ती रिपोर्टिंग करत असताना मागून एक माणूस आला आणि त्याने तिच्या पार्श्वभागाला स्पर्श केला. ती कोणत्या चॅनेलसाठी करते, असंही त्याने विचारले, परंतु इसा बालाडोने तिचे रिपोर्टिंग सुरू ठेवले.
जेव्हा त्या व्यक्तीने इसाचा हात धरला तेव्हा शो होस्ट करणारे नाचो आबाद म्हणाले, इसा, कृपया मला माफ करा. त्या माणसाने तुमच्या पार्श्वभागाला स्पर्श केला का?
तेव्हा इसानेही लगेच अँकरला उत्तर देत म्हटलं हो, त्या व्यक्तीने मला स्पर्श केला. तेव्हा अँकर संतापला आणि म्हणाला की तुम्ही त्या व्यक्तीला कॅमेरासमोर आणू शकता का? त्या मूर्खाला कॅमेरासमोर आणा. तो मूर्ख आहे. ती कोणत्या चॅनलसाठी काम करते हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे, मग त्यासाठी तिला स्पर्श करायची काय गजर आहे, असा प्रश्न अँकरने गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला विचारला. ती तिच्या शोसाठी काम करत होती, असंही तो म्हणाला.
पत्रकाराच्या या प्रश्नावर त्या व्यक्तीने निर्लज्जपणे उत्तर दिले की, मी काहीही चुकीचे केले नाही आणि त्यादरम्यान त्याने तिच्या केसांना स्पर्श केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर माद्रिद पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीला बेड्या घालून गाडीत बसवले. पत्रकाराच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.