सरकारी योजनेत हमीशिवाय कर्ज मिळेल
पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्जाचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज नाही. म्हणजेच मुद्रा योजनेअंतर्गत हमीशिवाय कर्ज उपलब्ध असून कर्जासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क लागू पडणार नाही आणि मुद्रा योजनेअंतर्गत तुम्ही कर्जाच्या परतफेडीचा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवता येतो. तसेच योजनेअंतर्गत कोणताही निश्चित व्याजदर नसल्यामुळे वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात. साधारणपणे किमान व्याज दर १० ते १२% असू शकतो.
मुद्रा योजनेत कोणाला अन् कुठून मिळते कर्ज?
छोटे उद्योग सुरू करण्यासाठीही या योजनेतून लोकांना कर्ज उपलब्ध दिले जात असून मधमाशी पालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन इत्यादी शेतीशी संबंधित कामांसाठी देखील मुद्रा योजनेत कर्ज घेतले जाऊ शकते. तुम्हाला गरज असल्यास तुम्ही PMMY पोर्टलद्वारे कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका, सहकारी बँका, ग्रामीण बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्थांकडून कर्ज उपलब्ध होऊ शकते.
PMMY आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता
इच्छुक अर्जदार या योजनेंतर्गत ऑफलाइन किंवा ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑफलाइन तुम्ही कोणत्याही कर्ज देणाऱ्या संस्थेशी (बँक/वित्तीय संस्था) संपर्क साधू शकता, तर ऑनलाइन अर्जासाठी अधिकृत वेबसाइट www.udyamimitra.in ला भेट द्या. या योजनेतून कर्ज घेण्यासाठी उद्योजकाचे वय २४ ते ७० वयोगटातील असले पाहिजे. तसेच कर्ज मिळविण्यासाठी आधार कार्ड/पॅन/पासपोर्ट/मतदार आयडी सारखा केवायसी पुरावा असणे आवश्यक आहे.