ठाणे : ठेकेदाराकडून तुटपुंजे वेतन दिले जात असून वारंवार केवळ आश्वासनच मिळत असल्याने ठाणे परिवहनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून संपाचे हत्यार उपसले आहेत. ठाणे परिवहनच्या घोडबंदर येथील आनंदनगर आगारात ३६० पुरुष व महिला वाहकांनी संप सुरू करत ठिय्या मांडला आहे. त्यामुळे सकाळपासून परिवहनच्या शंभर फेऱ्या रद्द झाल्या आहेत.

मराठा आंदोलनाचा फटका; तीन दिवसात STचे १५ कोटींचे नुकसान, पुण्यातून जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द

ठाणे परिवहनच्या आनंद नगर आगारात कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये २३५ पुरुष व १२५ महिला वाहक संपावर गेल्याने सकाळपासून परिवहनच्या शंभर फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. घोडबंदर, मुलुंड, कोपरी, बोरीवली मार्गावर धावणाऱ्या परिवहन सेवेवर परिणाम या संपाचा परिणाम झाला आहे. ठेकेदाराकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनाच्या मुद्द्यावरून परिवहन कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यासाठी प्रशासन आनंदनगर आगारात दाखल झाले असून मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असा कामगारांनी इशारा दिला आहे.

मोठी बातमी: एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, थकबाकीही लवकरच मिळणार; आंदोलन स्थगित

काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांनी महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी करत आंदोलन पुकारले होते. या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशाराही दिला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के करण्याला मान्यता दिली होती. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले होते. आता ठाण्यात विस्कळीत झालेली बससेवा पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढाकार घेतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here