मुंबई: राज्यात संसर्गाच्या विळख्यात सापडलेले आणखी ३२५ रुग्ण दगावले असून २४ तासांत तब्बल २३ हजार ८१६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ९ लाख ६७ हजार ३४९ इतकी झाली असून सध्या २ लाख ५२ हजार ७३४ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, आज दिवसभरात १३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. ( Latest Updates )

वाचा:

राज्यात मंगळवारी २० हजार १३१ नवीन करोना बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर आज हा आकडा मागे पडला व तब्बल २३ हजार ८१६ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १० लाखांच्या आणखी जवळ पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत करोनाच्या ४८ लाख ८३ हजार ६ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १९.८१ टक्के म्हणजेच ९ लाख ६७ हजार ३४१ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात उपचार घेतलेल्या रुग्णांची आजची संख्या ६५ हजार ३६१ इतकी आहे. जिल्ह्यात ५७६ तर पालिका हद्दीत २५ हजार ६६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

वाचा:

ठाणे जिल्ह्यात १९६४ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल १ हजार ९६४ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यापैकी ठाणे शहरात ४५५, कल्याण-डोंबिवली ५३६, नवी मुंबईमध्ये ३५५ रुग्ण वाढले आहेत. पुन्हा एकदा या शहरामध्ये एका दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बुधवारी जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णांच्या संख्येनंतर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १ लाख ३८ हजार ३९३ इतका झाला आहे. आतापर्यंत १ लाख १८ हजार ५५३ रुग्ण बरे झाले असून सध्या १६ हजार ३० रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात ३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा आकडा ३८१० वर गेला आहे. ठाणे शहरात बुधवारी ४५५ नवीन करोना बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या २८ हजार ६८१ वर पोहचली आहे. कल्याण-डोंबिवली शहरात ५३६ नव्या करोना रुग्णाची नोंद झाल्याने करोना रुग्णाची संख्या ३२ हजार ८२५ इतकी झाली आहे. नवी मुंबईतही रुग्ण वाढले असून ३५५ नवीन रुग्णांची भर पडल्यानंतर बाधितांचा आकडा २९ हजार १६५ इतका झाला आहे. वसई विरारमध्ये नवीन २५२ करोना बाधितांची नोंद झाली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here