पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांच्या चिरंजीवांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती धरला कणव वसंतराव चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन तावरे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र कणव चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन तावरे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे निशाण देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
राजकीय, सामाजिक व संघटनात्मक कार्यातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निश्चितच फायदा होईल व संघटनेच्या बांधणीसाठी ते अखंड कार्यरत राहतील, असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अंकुशआण्णा काकडे, माजी शहराध्यक्ष रविंद्र माळवदकर, प्रकाशअप्पा म्हसके आदी मान्यवर उपस्थित होते.