नवी दिल्ली : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी म्युच्युअल फंड देखील एक पर्यायी मार्ग आहे. शेअर बाजारात तुम्ही थेट पैसे गुंतवण्याऐवजी तुम्ही म्युच्युअल फंडाचा मार्ग अवलंबू शकता. यामध्ये गुंतवणूकदारांना बाजाराच्या तेजीच फायदा होतोच, पण पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असल्याने तोटाही कमी सहन करावा लागतो. याशिवाय चांगले शेअर्स शोधण्याची गुंतवणूकदारांची डोकेदुखीही कमी होते. त्यामुळेच म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत असून तुम्हीही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.

म्युच्युअल फंड नामांकित
इक्विटी बाजारात नियामक सेबीने यावर्षी मार्चमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एक परिपत्रक जारी केले होते आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी नॉमिनी जोडण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती, जी आता जवळ आली आहे. म्युच्युअल फंडात नॉमिनी (नामांकित) करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ असून हे काम करण्यासाठी आता गुंतवणूकदारांकडे १५ दिवस शिल्लक आहेत. म्हणजे जर तुम्ही म्युच्युअल फंडात पैसेही गुंतवले, तर तुमच्याकडे नॉमिनीशी संबंधित काम करण्यासाठी फक्त दोन आठवडे शिल्लक आहेत.

फ्रीडम SIP म्हणजे काय, सामान्य प्लॅनपेक्षा मिळतो जास्त फायदा? गुंतवणूक करण्यापूर्वी वाचा
अंतिम मुदतीनंतर काय होईल?
यापूर्वी म्युच्युअल फंडा नॉमिनी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ होती. तथापि नंतर सेबीने २८ मार्च रोजी नवीन परिपत्रक जारी केले आणि ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली. आपल्या परिपत्रकात सेबीने स्पष्टपणे केले होते की म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी नॉमिनीबाबत अंतिम मुदतीपर्यंत स्थिती स्पष्ट केली नाही, तर त्यांचे फोलिओ गोठवले (फ्रीज) जातील.

म्युचुअल फंड असावा तर असा, या फंडावर लोकही फिदा, 22 वर्षे सतत देतोय सुपर से भी उपर रिटर्न्स!
गुंतवणूकदारांकडे कोणते पर्याय
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या फोलिओचे डेबिट गोठवणे टाळायचे असेल तर दोन उपाय आहेत. पहिला म्हणजे नामनिर्देशन करणे म्हणजे एखाद्याला नॉमिनी बनवणे आणि दुसरा पर्याय म्हणजे ऑप्ट-आऊट करणे, म्हणजे जर तुम्हाला कोणाला नॉमिनी करायचे नसेल तर तुम्हाला हे सांगावे लागेल. यासाठी तुम्हाला ऑप्ट-आऊट करण्याचे जाहीर करून सबमिट करावे लागेल.

म्युच्युअल फंडामध्ये SIP करताय? ‘या’ चुका पडतील महागात… काळजी घेतली तरच होईल फायदा
संयुक्त खात्यातील गुंतवणूकदारांना कोणते पर्याय
जर म्युच्युअल फंड एकापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र खरेदी केला असेल म्हणजेच खाते वैयक्तिक नसून संयुक्त असेल, तर अशा स्थितीत सर्व संयुक्त धारकांमा एकत्र येऊन नॉमिनी करावा लागेल. हे अशा स्थितीसाठी आहे जेव्हा संयुक्त युनिटचे सर्व धारकांचे निधन होते. म्हणजे संयुक्त युनिट असले तरी हे काम मुदतीपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here