मुंबई : बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. गुरुवारी अभिनेते रियो कपाडिया यांचं निधन झालं होतं. आज अभिनेते सुनील श्रॉफ यांचं निधन झालं आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं, नाही मात्र मागील काही काळापासून ते आजारी असल्याची माहिती आहे. अक्षय कुमार, पंकज त्रिपाठीसोबत ओह माय गॉड २ सिनेमात सुनील श्रॉफ यांनी भूमिका साकारली होती.

रिपोर्ट्सनुसार, सुनील श्रॉफ यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून बरी नव्हती. ते आजारी होते. अखेर गुरुवारी त्यांची अखेरचा श्वास घेतला. सुनील यांनी इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी OMG 2 अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यासोबत फोटो शेअर केला होता.

विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात होती, नंतर ७५ लाखांची मागणी; बाहुबली फेम अभिनेत्रीवर झालेले गंभीर आरोप
सुनील श्रॉफ यांनी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर ते राधिका मंदाना अशा अभिनेत्रींसोबत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. सिनेमांसह ते अनेक ब्रँड्ससाठी जाहिराती करत होते.

आपण बोलून निघून जायचं, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडिओवर सौमित्र यांची मार्मिक कविता

सुनील श्रॉफ यांनी ‘ओह माय गॉड २’ आधी ‘शिद्दत’, ‘द फाइनल कॉल’, ‘कबाड़ द कॉइन’, ‘जूली’, ‘अभय’ अशा सिनेमात काम केलं होतं. कधी डॉक्टर म्हणून, तर कधी वडिलांची भूमिका साकारत त्यांनी इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली होती.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेते रियो कपाडिया यांचं निधन झालं होतं. ‘दिल चाहता है’, ‘चक दे इंडिया’, ‘हॅप्पी न्यू ईयर’ अशा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले रियो यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं होतं. Made In Heavan 2, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ अशा वेबसीरिजमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.

बॉलिवूडमध्ये एकामागे एक अनेक दिग्गजांनी या जगाचा निरोप घेतला. रिओ यांच्याआधी शोले सिनेमातील अभिनेते बीरबल खोसला यांचं निधन झालं होतं. ते ८४ वर्षांचे होते. १२ सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here