कोल्हापूर: महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहित धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जे ठरवेल ती माझी भूमिका असेल, असे निवेदन खासदार यांनी मराठा आरक्षणाबाबत केले आहे. ( on )

वाचा:

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे मराठा समाजाच्या उमेदवारांना २०२०-२०२१ या वर्षात शिक्षण आणि नोकऱ्यांत एसईबीसी आरक्षण मिळणार नाही. हे प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले असून घटनापीठाच्या निर्णयावर मराठा आरक्षणाचं पुढील भवितव्य ठरणार आहे. कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीवर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत असताना व भाजपकडून याप्रश्नी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येत असताना खासदार संभाजीराजे यांनी महत्त्वाची भूमिका मांडली.

वाचा:

‘आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे’, असे निवेदन संभाजीराजे यांनी या निमित्ताने केले आहे.

वाचा:

संभाजीराजे यांनी आपल्या निवेदनातून सरकारलाही सज्जड इशारा दिला व यापुढे समाज जे ठरवेल ती माझी भूमिका असेल, असेही निक्षून सांगितले. ‘महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहित धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. मी मराठा समाजाचा घटक या नात्याने जबाबदारीपूर्वक हे सांगत आहे, असे संभाजीराजे यांनी बजावले.

हा काळा दिवस: भाजप

राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली गेली. स्थगिती उठण्यासाठी किती वर्षे वाट पहावी लागेल हे सांगता येत नसल्याने आजचा दिवस मराठा समाजासाठी काळा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांनी व्यक्त केली. या संकटाच्या काळात भाजपा मराठा समाजासोबत आहे व समाजाच्या कल्याणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here