सांगली, मिरज, कुपवाड महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील एका व्यक्तीचा बुधवारी करोना संसर्गामुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह महापालिका प्रशासनाकडे सोपवण्याऐवजी परस्पर हरिपूर रोडवरील स्मशानभूमीत आणला. तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. वास्तविक करोनाबाधित मृतदेहांवर महापालिकेच्या मिरज-पंढरपूर रोडवरील कोव्हिड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, नातेवाईकांनी याबाबत महापालिका प्रशासनाला काहीच कळवले नाही. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी यावर आक्षेप घेऊन महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या. याची माहिती मिळताच सांगली पोलिस आणि महापालिकेचे कर्मचारी तातडीने दाखल झाले. पीपीए किट परिधान करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दफन केलेला मृतदेह जेसीबीच्या मदतीने पुन्हा बाहेर काढून तो कोव्हिड स्मशानभूमीकडे पाठवला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times