मुंबई : दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की मंत्र्यांचं पर्यटन आहे? असा सवाल विचारून राज्य सरकारच्या मराठवाड्यातील शाही मंत्रिमंडळ बैठकीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी… मंत्रिमंडळ बैठकीसाठी करोडो रुपये खर्च करताना सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे, अशा शब्दात वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी संभाजीनगरमध्ये होते आहे. बैठकीसाठी गेल्या काही दिवसांपासून यंत्रण काम करते आहे. या बैठकीसाठी वाहने, हॉटेल्स, विश्रामगृह आरक्षित करण्यात आले आहेत. यात मंत्री अधिकाऱ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स आरक्षित केल्याने सरकारवर सर्व स्तरातून टीका होत आहे. सप्टेंबर महिना उजाडला तरी अपेक्षित पाऊस न पडल्याने संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहेत. अशा स्थितीत मंत्री अधिकाऱ्यांनी असा डामडौल करणं किती उचित आहे? असा सवाल विचारला जातोय. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारला धारेवर धरलं आहे.

राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. दुष्काळग्रसक संभाजीनगरमध्ये बैठक घेताना आणि करोडोंचा खर्च करताना सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, अशा कडक शब्दात राज्य सरकारला लक्ष्य करताना मंत्रिमंडळासाठी आरक्षित केलेल्या खोल्यांचे रेटकार्डच वडेट्टीवारांनी जाहीर केले आहे. तसेच विश्रांतीला फाईव्ह स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी… दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन? असा सवाल त्यांनी केलाय.

निवडणूक आयोगात दादा vs साहेब, पुण्यातही झलक, अजित पवारांची बैठकीला दांडी, शरद पवारांसमोर जाणं टाळलं!

कोणत्या हॉटेलमध्ये किती रूम बुक आणि कुणासाठी? वडेट्टीवारांनी यादीच दिली

फाईव स्टार हॉटेल ३० रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री)
ताज हॉटेल ४० रूम बुक (सर्व सचिव)
अमरप्रीत हॉटेल ७० रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)
अजंता अॅम्बेसेडर ४० रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)
महसूल प्रबोधिनी १०० रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)
पाटीदार भवन १०० (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)
वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – २० ( इतर अधिकारी)

एकूण १५० गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत. औरंगाबाद शहरातील देखील १५० गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत १ हजार ते दीड हजार असणार आहे.

मंत्रिमंडळ बैठक संभाजीनगरात, करोडोंचा खर्च, ३०० गाड्यांचा ताफा, ४०० अधिकारी दिमतीला, जयंत पाटलांची सडकून टीका
दरम्यान, या बैठकीच्या तयारीसाठी शासकीय अधिकाऱ्यांचं बैठकासत्रही सुरु असून मंत्रिमंडळासाठी सुमारे ४०० अधिकारी दिमतीला असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीसाठी आजपासूनच (शुक्रवारी) काही मंत्री शहरात दाखल होत आहे. तर काही मंत्री शनिवारी सकाळी दाखल होतील. मंत्रिगणासाठी शासकीय विश्रामगृहासह, हॉटेल रामा आणि ताज या पंचतारांकित हॉटेल्समधील खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. या निमित्ताने विश्रामगृहांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

भाजपच्या हर घर जोडो अभियानाला आता शेवटची घर घर लागलीय; विजय वडेट्टीवारांनी डिवचलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here