पुणे : पुण्याला पुलांचं शहर म्हटलं जातं. पुण्यात (Histrory Of shivaji Bridge In Pune) अनेक ब्रिटिशकालीन आणि त्यानंतर स्वातंत्र्याची चळवळ सुरु असताना बांधण्यात आलेले जुने (shaniwarwada)  दगडी पूल आहेत. मात्र यातच काही पूल प्रसिद्ध आहे आणि काही पुलांना 100 हून अधिक वर्षदेखील पूर्ण झाले आहे. त्यातलाच एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पूल. याच पुलाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि याच पुलामुळे पुण्याची पूर्व पुणे आणि पश्चिम पुणे, अशी विभागणी करण्यात आली होती. 

पुण्याची ओळख असलेल्या शनिवारवाड्यासमोरील दगडी कमानचा देखणा नवा पूल अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पूल म्हणजे अवघे 100 वर्षे वयोमान असलेला पूल . मुठा नदीवर 1923 साली काळ्या बसाल्ट खडकातून, अर्धवर्तुळाकार सज्जे असलेला हा पूल ब्रिटीश काळात बांधला गेला. पुण्यातील राव बहादूर गणपतराव केंजळे यांनी या पुलाचे बांधकाम केलं होतं. 

राव बहादूर गणपतराव केंजळे यांचे वंशज असलेले अभिजित केंजळे सांगतात की, छत्रपती शिवाजी महाराज पुलाची खासियत म्हणजे समोर ऐतिहासिक शनिवारवाडा, बाजूला पुणे महानगरपालिका आणि खाली पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीतील पीएमपीएमएल ही होय. आज हा पूल आपली 100 वर्षे पूर्ण करीत आहे. 1923 साली 17 सप्टेंबर रोजी मुंबई इलाख्याचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज लॉईड यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल ई. एस प्रोज हे त्यावेळी ब्रिटीश आमदानीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव होते. त्यांनी या पुलाची रचना केली तर पुण्यातील राव बहादूर गणपतराव केंजळे यांनी त्याचे बांधकाम केले. आधी हा पूल जॉर्ज लॉईड या नावाने ओळखला जायचा. स्वातंत्र्योत्तर काळात छत्रपती शिवाजी महाराज पूल असे त्याचे नामकरण करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने या पुलाला ग्रेड 2 हेरिटेज वास्तूचा दर्जा देखील देण्यात आला आहे. 

भांबुर्डा गाव अन् पुणे जोडण्यात महत्वाचा वाटा…

बसाल्ट खडकातून उभारलेला, अर्धवर्तुळाकार सज्जे असलेला, प्रत्येक बुरुजाच्या दोन्ही बाजूस फुलांची सुंदर नक्षी असलेला आणि दोन्ही बाजूस दगडी पायऱ्या असलेला हा पूल भांबुर्डा गावाला जोडणारा पूल आहे. या पुलामुळे भांबुर्डा गाव पुण्याशी जोडले गेले आणि पुण्याची पूर्व व पश्चिम अशी विभागणी झाली.

 

(सगळे फोटो राव बहादूर गणपतराव केंजळे यांचे वंशज असलेले अभिजित केंजळे यांच्या संग्रहातून घेतलेले आहेत )

इतर महत्वाची बातमी-

Pune Ganeshotsav 2023 : चिमण्या, मद्रासी, गुपचूप, मोदी, माती गणपती; पुण्यातील गणपती मंदिरांना ही हटके नावं कशी पडली?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here