म. टा. प्रतिनिधी, पुणेः पुणे शहरात गंभीर रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात ९२७ रुग्ण गंभीर स्थितीत अतून त्यापैकी ४८३ रुग्णाची स्थिती चिंताजनक आहे. एकीकडे रुगण वाढल्याची चिंता सतावत असताना दुसरीकडे २०१३ रुग्ण एका दिवसात बरे झाल्याने घरी परतल्याने दिलासा मिळाला आहे. तर शहरातील चाचण्यांच्या संख्येने पाच लाखांचा आकडा ओलांडला आहे.

पुणे शहरात बुधवारी ७६०९ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे २०७८ जण नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत एकूण 5 लाख ७८६६ एवढ्या चाचण्या झाल्या असून त्यापैकी १ लाख ११ हजार ९१६ एवढ्या जणांना शहरात गेल्या सहा महिन्यांमध्ये लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरात ९२७ रुग्ण गंभीर आहेत. गेल्या काही दिवसांपासून हळूहळू गंभीर रुग्णांच्या संख्येत भर पडताना दिसत आहे. त्यापैकी ४८० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर ४४४ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here