घेकोलंबो : भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे आणि आशिया चषक स्पर्धेत विजयी हॅट्रीक साकारण्यासाठी सध्या फक्त एक पाऊल लांब आहे. या सामन्यातील विजयासह भारतीय संघ आपल्या चाहत्यांना अजून एक आनंदाची बातमी देणार आहे. या सामन्यात संधी मिळाल्यावर शार्दुल ठाकूरने त्याचे सोने केल्याचे पाहायला मिळाले. कारण शार्दुलने यावेळी सर्वाधिक विकेट्स घेत भारतासाठी विजयाचा पाया रचला.भारताने टॉस जिंकला आणि रोहित शर्माने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून यावेळी शार्दल ठाकूरने अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळे त्याला या सामन्यात सर्वाधिक विकेट्स मिळवता आल्या. शार्दुलला यावेळी मोहम्मद शमीने चांगली साथ दिली. या गेल्या सामन्यात शार्दुलला संधी दिली नव्हती. भारतीय संघात जेव्हा बदल करण्यात आला तेव्हा शार्दुल ठाकूरला बाहेर करून अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले होते. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय साकारला. या विजयासह भारतीय संघ आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. त्यामुळे या सामन्यात भारताने मोठे बदल केले. हे बदल करताना शार्दुलला संघात स्थान दिले गेले. शार्दुलने या सामन्यात भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या शकिब अल हसनला बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले होते. या सामन्यात शकीब हा दमदार फलंदाजी करत होता. अर्धशतकानंतर तो शतकासमीप पोहोचला होता. त्यामुळे आता तो शतक झळकावणार, असे सर्वांनाच वाटत होते. पण शार्दुलने शकिबला बाद केले आणि बांगलादेशला मोठा धक्का दिला. शकिबने यावेळी ६ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८० धावांची दमदार खेळी साकारली. बांगलादेशकडून तोवहित ह्रिदॉयने अर्धशतक खेळी साकारली, तो ५४ धावांवर असताना त्याला मोहम्मद शमीने बाद केले. या दोन दमदार खेळींच्या जोरावर बांगलादेशने भारतापुढे विजयासाठी २६६ धावांचे आव्हान ठेवले आहे. या विजयासह भारतीय संघ आपल्या चाहत्यांना आयसीसीच्या क्रमवारीत एक गुड न्यूज देऊ शकतो.भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात दमदार कामगिरी पहिल्या डावात केली आहे. त्यामुळे आता ते विजय साकारणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here