बुलढाणा: मानसिक तणावातून युवकाने स्वतःच्या हाताने गळा चिरुन घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना खामगाव शहरातील अनिकट रोड भागात उघडकीस आली. आकाश प्रमोद खाकरे (२८) याने १३ सप्टेंबरला रात्री राहत्या खोलीत चाकुने स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबियांनी त्याची खोली उघडली असता ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आईवडील कामासाठी गेले; तरुणाचे धक्कादायक पाऊल, क्लासवरून बहीण घरी आली, दरवाजा उघडताच…
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव शहरातील अनिकेट भागातील आकाश प्रमोद खाकरे हा युवक मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. दरम्यान काल रात्री त्याने स्वःच्या रूममध्ये जाऊन धारदार चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतला. यानंतर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी मृतकचे काका अजय खाकरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

इथं पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाची प्रतिक्षा अन् पावसात वणवण; चंद्रपूरच्या कोलाम बांधवांचा वनवास संपेना

खाकरे कुटुंबीय अनिकट रोड भागात रविंद सरोदे यांच्या घरात भाड्याने राहतात. आकाशने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. आज तान-तणाच्या आणि धावपळीच्या युगामध्ये सतत तुम्हाला मुख्यतः युवकांना सिद्ध करावे लागतात. शिक्षण किंवा रोजगाराच्या चांगल्या संधीकरिता सतत धावपळ करावी लागते. त्यामध्ये कुठे टोकाचे पाऊल ही युवा पिढी उचलते आहे. कोणत्या दिशेने जात आहे, हे निश्चित चिंतन करण्यासारखी बाब म्हणावी लागेल.अनेक वेळा नैराश्यातून आणि मेडिटेशन सारखे प्रबोधन वेळोवेळी केल्या जाते. त्यानंतर देखील युवा पिढी या टोकाच्या पावलाच्या दिशेने आपला प्रवास करतात. संपूर्ण परिवार अंधकारमय होऊन जातो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here