संतोष शिराळे, सातारा : पुसेसावळी (ता. खटाव) येथील रविवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सामाजिक संघटना, पुरोगामी संघटनांसह राजकीय पक्षांच्यावतीनं मूक मोर्चाचं आयोजन शनिवारी करण्यात येणार होतं. उद्या निघणारा मोर्चा आयोजित करण्यात येणारा मूक मोर्चा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाच्या विनंतीनंतर घेण्यात आला आहे. शनिवारी साताऱ्यातून निघणारा मूक मोर्चा प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार रद्द करण्याचा निर्णय संबंधित सामाजिक संघटनांनी घेतला आहे. साताऱ्यात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. तर, कराडमध्ये देखील मोर्चा आयोजित करण्यात येणार नाही. यामुळं सातारा जिल्हा प्रशासनावरील ताण कमी झाला आहे.

पुसेसावळी येथे घटनेच्या निषेधार्थ अनेक सामाजिक संघटनानी मूक मोर्चा काढण्याची भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. गणेशोत्सवाचा सण तोंडावर असल्याने कोणत्याही प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. संघटनांनी मोर्चा काढू नये, अशी विनंती केली होती. सामाजिक संघटनांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत उद्या काढण्यात येणारा मूक मोर्चा रद्द केला आहे.
सुप्रिया सुळेंच्या त्या प्रश्नावर अजितदादांनी हात जोडत काढता पाय घेतला…!

कराडला दोन्ही समाज बांधवांकडून मोर्चे काढणार नसल्याचे आश्वासन

पुसेसावळी येथे सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्ह्यात या प्रकारानंतर विविध संघटनांकडून मोर्चे, प्रतिमोर्चे काढण्याबाबत केलेल्या नियोजनानंतर पोलीस प्रशासनाने संबंधित समाज बांधवांसमवेत बैठका घेऊन याबाबत चर्चा सुरू केली होती. कराडमधील बैठकीत दोन्ही समाज बांधवांकडून कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढण्यात येणार नसल्याचे सांगून शांतता अबाधित राखण्याचे आश्वासन दिले गेले होते..
भारताने पाकिस्तानला दिला सर्वात मोठा धक्का, पराभवानंतर जखमेवर मीठ चोळलं…
कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या अध्यक्षतेखाली डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या उपस्थित बैठका घेण्यात आल्या.

Dombivli Building Collapse : डोंबिवलीत ४० खोल्यांची इमारत कोसळली, प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये, बचावकार्य सुरु

गुन्हेगारांवर कडक कारवाई करु; साताऱ्यात शांतता ठेवा, प्रशासनाला सहकार्य करा | शंभुराज देसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here