कोल्हापूर: तिचं वय शंभरी पार झालेलं… निवांत जीवन जगत असताना एक दिवस अचानक तिला करोनाने गाठलं. मात्र न घाबरता ती त्याला धाडसाने सामोरी गेली. त्यावर तिने मात करत आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. ( Latest Updates )

वाचा:

येथील व्हाइट आर्मीच्यावतीने जैन बोर्डिंग येथे सुरू केलेल्या मधील ही घटना. दहा दिवसांपूर्वी या सेंटरमध्ये १०३ वर्षांची एक आजी उपचारासाठी दाखल झाली. तिच्या नातवाचा अहवाल अगोदर पॉझिटिव्ह आला, त्यानंतर सुनेला बाधा झाली. नंतर या आजीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिला उपचारासाठी व्हाइट आर्मीच्या सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

वाचा:

दहा दिवस आजीने अतिशय धाडसाने या रोगा विरोधात मुकाबला केला. रोज डॉक्टर सांगतील ते उपचार तिने अगदी मन लावून केले. आपल्या सोबत असणाऱ्या इतर रुग्णांनाही ती धीर द्यायची. रोग किरकोळ आहे, धाडसाने सामना करा, तुम्ही नक्की मात कराल, अशी प्रेरणाही ती इतरांना द्यायची. हे करताना स्वतःही त्याच धाडसाने उपचार करून घ्यायची. या उपचारांना यश आले आणि दहा दिवसांत आजी बरी झाली.

वाचा:

आजीचा बुधवारी वाढदिवस होता. तिने १०४ व्या वर्षात पदार्पण केले. एकीकडे वाढदिवस आणि दुसरीकडे करोनावर मात केल्याचा आनंद. त्यामुळे तिचा आनंद गगनात मावेना. कोविड सेंटरमध्ये तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. बाहेर पडताना तिने इतरांनाही आनंदात राहा, धाडसी व्हा असा सल्ला दिला.

या संदर्भात कोविड केअर सेंटरचे प्रमुख म्हणाले, ‘या आजीची ही घटना इतर सर्व रुग्णांना प्रेरणा देणारीच ठरली आहे. तुम्ही न घाबरता सामोरे गेला तर करोनावर सहज मात करू शकता, हे आजीने दाखवून दिले आहे.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here