म. टा. प्रतिनिधी, पुणे: करोनाच्या विषाणूच्या थैमानामुळे देशभरात लॉकडाउन झाला. त्यामुळे नागरिकांच्या मनात आर्थिक आणि नोकरीबाबत असुरक्षितता वाढली. सोशलायझेशन कमी झाले. व्यायाम बंद झाले. तसेच वर्क फ्रॉममुळे दिनश्चर्या बदलली. या सर्वांमुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार ५० टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले.

राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ

राज्यात मंगळवारी २० हजार १३१ नवीन करोना बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर बुधवारी हा आकडा मागे पडला व तब्बल २३ हजार ८१६ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १० लाखांच्या आणखी जवळ पोहचली आहे.

सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात

राज्यात सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात उपचार घेतलेल्या रुग्णांची आजची संख्या ६५ हजार ३६१ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात ५७६ तर मुंबई पालिका हद्दीत २५ हजार ६६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here