सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ९६ व्या सर्वसाधारण सभा आज सांगलीतील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. नेहमी कर्ज फेडण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे तगादा लावणाऱ्या जिल्हा बँकेने बड्या कर्जदारांच्या मनोरंजनाची चांगलीच सोय केल्याचे यावेळी दिसून आले. बड्या कर्जदारांना मात्र अभय दिल्याचे नेहमीच टीका होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शंभर टक्के कर्ज वसुली करणाऱ्या ५७४ विकास सोसायट्यांचा सत्कारचा यावेळी आयोजित करण्यात आला होता.
सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले; गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदासाठी की…
या कार्यक्रमांमध्ये जेवणावळीचे देखील आयोजन करण्यात आले होते. जेवणावळी नंतर मात्र मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. आलिशान मंगल कार्यालयात आयोजित केलेली बैठक त्यानंतर जेवणाचा उडवून दिलेला धमाका आणि मनोरंजनाच्या नावाखाली ऑर्केस्ट्रा बोलावून केलेली लाखों रुपयांची उधळपट्टी यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. जिल्हा बँकेच्या या अध्यक्ष पदाधिकारी आणि सभासदांनी आपल्या अशा गैरवर्तनाने सहकार क्षेत्राला आणि त्याच्या मूळ तत्वांनाच काळीमा फासल्याचे चित्र सांगली जिल्ह्यात दिसून आले आहे.

उदयनराजेंनी ठेका धरला, खासदार दहीहंडी महोत्सव गाजवला

एकीकडे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असताना, खरीप पीक पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना जिल्हा बँकेच्या कार्यक्रमात मात्र ऊसाला लागल कोल्हा या गीतावर ठेका धरल्याने जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर टीकेची जोड उठवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात यंदा राज्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. पावसाने दिलेल्या प्रचंड ओढीमुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यात अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे सोडून त्यांच्याच पैशाच्या जोरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पदाधिकारी चक्क नाचगाण्यात मश्गूल झालेले पाहून शेतकरी मात्र या बॅंकेचा उपयोग कशासाठी, असा सवाल विचारताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here