दरम्यान, पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कर आणि चिनी सैन्याच्या कमांडर्समध्ये बुधवारी बातचीत झाली. हॉटलाइनवर त्यांनी काही या सीमेवर तणाव वाढू नये, यावर या विषयावर हॉटलाइनवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री गुरुवारी रशियाच्या मॉस्को येथे भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे आणि सुमारे ३०-४० चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील रेझांग ला येथे भारतीय चौकीच्या अगदी जवळ असलेल्या भागात ठाण मांडून आहेत.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे दोन्ही देशांच्या सैन्यात एलएसीवर झालेल्या ताज्या संघर्षावर चर्चा करतील. दोघे मॉस्को येथे शांघाय सहकार संघटनेच्या ( SCO) बैठकीस उपस्थित राहतील. संध्याकाळच्या बैठकीपूर्वी ते रशिया-भारत-चीन यांच्यात दुपारच्या जेवणाच्या बैठकीत एकमेकांच्या समोरही असतील. या दोघांच्या भेटीचा उद्देश फक्त पूर्व लडाखमधील सीमेवरील तणाव कमी करणं हा आहे.
सीमेवर ४५ वर्षांनंतर प्रथमच गोळीबार
दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांवर हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. भारत आणि चीन यांच्यातील एलएसी जवळपास ४५ वर्षानंतर प्रथमच गोळीबार झाला आहे. जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री आणि एससीओचे आयोजक सर्गेइ लाव्हरोव यांच्या भेट घेतली. दोघांमध्ये चांगली चर्चा झाली. आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरही चर्चा केली, असं जयशंकर यांनी बैठकीनंतर सांगितलं.
चिनी सैनिक रॉड्स, भाले आणि धारदार शस्त्रास्त्रांनी सज्ज
सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. कारण यापूर्वी १९७५ मध्ये सीमेवर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर १९९६ आणि २००५ मध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही देशांत करार झाला. सीमेवर कुठलाही संघर्ष झाल्यानंतर कुणीही गोळीबार करणार नाही, असं या करारात नमूद करण्यात आलं. चिनी सैनिकांकडे रॉड्स, भाले, धारदार शस्त्रास्त्र आहेत. सोमवारी त्यांनी भारतीय लष्कराच्या चौकीजवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही देशांच्या सैन्यात १५ जूनला रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. यामुळे सीमेवरील तणावात लक्षणीय वाढ झाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times