नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC ने यावर्षीच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी एक नवीन सुरू केली आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते. LIC ने माहिती दिली की ही योजना एक नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेट वैयक्तिक बचत आणि सिंगल प्रीमियम लाइफ प्लॅन असून योजनेचा सेटलमेंट पर्याय मासिक/त्रैमासिक/अर्धवार्षिक/वार्षिक अंतराने उपलब्ध आहे.

LIC धन वृद्धी योजनेत काय खास?
एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार या योजनेतून निवडण्यासाठी दोन पर्याय असतील. या अंतर्गत ‘मृत्यूवर विम्याची रक्कम’ पर्याय निवडल्यास मूलभूत विमा रकमेच्या सारणीच्या प्रीमियमच्या १.२५ पट किंवा १० पट असू शकते. तसेच या पॉलिसीमध्ये गुंतवणूकदारांना आयकराच्या कलम ८०सी तर्गत कर सूटही दिली जाईल आणि एखादी व्यक्ती या योजनेत १०, १५ किंवा १८ वर्षांसाठी पैसे रोखू शकते.

कमी पैशांमध्ये जास्त रिटर्न देऊन श्रीमंत करणारी धमाकेदार योजना; फायदे वाचून करा गुंतवणूक
याशिवाय एलआयसीच्या या योजनेत किमान ९० दिवस किंवा ८ वर्षांसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. ३२ ते ६० वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त गुंतवणूकदार पैसे गुंतवू शकतात. या योजनेत किमान विमा रक्कम १.२५ लाख रुपये आहे. एलआयसी वेबसाइटनुसार ही पॉलिसी एक हजार रुपये विमा रकमेवर ७५ रुपयांपर्यंत अतिरिक्त हमी देते.

LIC योजनेचा प्रीमियम
दरम्यान, एलआयसी धन वृद्धी पॉलिसी ही एकल प्रीमियम पॉलिसी असून पॉलिसीचा मुदत कालावधी १० वर्षाचा असेल. तसेच एलआयसीने अलीकडेच नवीन प्लॅन लॉन्च केला असून तो क्लोज एंडेड प्लान आहे. तसेच एलआयसीच्या या विमा योजनेत तुम्ही २३ जून ते ४० सप्टेंबर या कालावधीत गुंतवणूक करू शकता, त्यामुळे जर तुम्हाला त्यात पैसे गुंतवायचे असतील आणि फायदा मिळवायचा असेल तर लवकर करा कारण पॉलिसी बंद होण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

एकदाच पैसे गुंतवा अन् पेन्शन स्वरुपात मिळेल जबरदस्त रिटर्न्स; जाणून घ्या सविस्तर माहिती
मॅच्युरिटीवर हमी परतावा
दरम्यान, जर पॉलिसी सुरू असताना धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली असताना मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर हमी रक्कम देण्याचीही तरतूद आहे. यामध्ये, ऑफर केलेली किमान मूळ निश्चित रक्कम १.२५ लाख रुपये आहे जी पाच हजार रुपयाच्या पटीत वाढविली जाऊ शकते.

एलआयसीची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा, दरमहा मिळेल १६ हजाराची पेन्शन…
विम्याची रक्कम १० पट होणार
एलआयसीच्या या प्लॅनमध्ये दोन पर्याय आहेत. ज्यामध्ये मृत्यूवरील विम्याची रक्कम १.२५ पट किंवा दुसऱ्या पर्यायामध्ये १० पट असू शकते. अशा स्थितीत तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर निवडलेल्या कालावधीनुसार तुमचे कमाल वय ३२ ते ६० वर्षे असले पाहिजे. तथापि या योजनेचे किमान वय १०, १५ आणि १८ वर्षे देखील उपलब्ध आहे आणि निवडलेल्या मुदतीनुसार किमान वय ९० दिवसांपासून ते ८ वर्षांपर्यंत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here