म. टा. प्रतिनिधी, लोणावळा: ‘मावळातील शेतकरी हा आपला मुख्य केंद्रबिंदू आहे. मागील काळात काय झाले यावर चर्चा न करता यापुढे राजकीय मतभेद, मनभेद व पक्ष बाजूला सारून शेतकऱ्यांच्या व मावळच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. जोपर्यंत हा प्रकल्प कायमचा रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे. सरकारने आपल्या मागणीचा विचार केला नाही, तर यापुढे सर्वानुमते निर्णय घेऊन लढा अधिक तीव्र करावा लागेल,’ अशा इशारा माजी राज्यमंत्री यांनी दिला आहे.पवना थेट जलवाहिनीच्या कामावरील स्थगिती उठविल्याने आक्रमक झालेल्या मावळमधील नागरिकांनी शुक्रवारी निषेध मोर्चा काढून राज्य सरकारविरोधात आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी भेगडे बोलत होते.मावळातील सर्वपक्षीय कृती समिती व विविध संघटनांच्या वतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या मंदिरापासून वडगावातील मुख्य चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या वेळी माजी मंत्री मदनशेठ बाफना, बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, ‘आरपीआय’चे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी आदी उपस्थित होते. माजी मंत्री मदनशेठ बाफना व मोर्चात सहभागी झालेल्या महिलांच्या हस्ते मावळचे तहसीलदार रणजीत देसाई यांना निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला विश्वासात घेण्याची गरज होती. सरकारचा हा निर्णय निषेधार्थ आहे. मी पक्ष बदलला असला तरी निष्ठा व तत्त्व विसरलो नाही. यापुढे मी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभा आहे.– सुनील शेळके, आमदारतालुक्याच्या हितासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांना एकत्र येऊन हा लढा लढावा लागणार आहे. आतापर्यंत विविध प्रकल्पांसाठी मावळातील जमिनी देण्यात आल्या आहेत. मात्र, यापुढे जमिनी देताना विचार करण्याची वेळ आली आहे. हा प्रकल्प कायमचा रद्द करून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे.– मदनशेठ बाफना, माजी मंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here