ठाणे : दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरात वाढ झाली असून यातही लाल फुलांचे दर चांगलेच कडाडले आहेत. श्रावण महिन्यापासून फुलांची मागणी वाढत असली तरी यंदा श्रावण महिन्यात १० रुपये किलोपर्यंत घसरलेला झेंडू ४० आणि ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. रविवारपासून झेंडूचे दर ६० ते ८० रुपये होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. बाप्पाचे स्वागत लाल रंगाच्या फुलांनी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे लाल शेवंती, लाल गुलाब, जरबेरा फुलांचे दर १०० रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत.

जास्वंद हे बाप्पाचे विशेष आवडते फूल असल्यामुळे प्रत्येकजण पहिल्या दिवशी पूजेसाठी दूर्वांबरोबरच जास्वंदीच्या फुलांचा शोध घेताना दिसतो. मिळेल त्या किमतीत जास्वंद खरेदी केली जात असल्याने या फुलांचे दर वाढतात. यंदा जास्वंदीच्या एका फुलासाठी भक्तांना २० ते २५ रुपये मोजावे लागणार आहेत, तर ४० रुपयांना मिळणारा लाल गुलाब १५० रुपयांवर पोचला आहे.

पर्यटकांसाठी गुड न्यूज; मरीन ड्राईव्ह सुशोभिकरणाचा श्रीगणेशा, ‘या’ परिसरांचा हेरीटेज विकास होणार
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल मार्केटमध्ये ३५० हून अधिक फूल विक्रेते असून श्रावण, गणेशोत्सव आणि दसऱ्याच्या काळात या मार्केटमध्ये फुलांची मागणी वाढते. संपूर्ण वर्षभराची कमाई याच काळात करता येत असल्याने विक्रेतेदेखील फुलांची आगाऊ मागणी नोंदवतात. नगर, नाशिकसह अनेक भागातून फुलांची आवक होत असून कल्याण या मुख्य बाजारातून विक्रेते फुलांची खरेदी करतात यामुळे एरव्ही पहाटे ३ पासून बाजारातील उलाढाल सुरू होत असली तरी गणेशोत्सव जवळ येऊ लागताच फूल मार्केट बंदच होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कल्याणच नव्हे तर नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि मुंबईतून व्यापारी फुलांची खरेदी करण्यासाठी दररोज पहिली लोकल पकडून कल्याणात दाखल होतात. दुसरीकडे कसारा, इगतपुरी, नाशिककडून आदिवासी महिलादेखील बाप्पाच्या पूजेसाठी लागणारी विविध प्रकारची पाने आणि फुले विक्रीसाठी आणतात. सर्व प्रकारच्या फुलांना कमीअधिक प्रमाणात मागणी वाढल्याने मागील महिन्याच्या तुलनेत फुलांचे दर तिपटीने वाढल्याची माहिती व्यापारी नितेश पाखले यांनी दिली.

शुक्रवारचे दर (रुपये प्रतिकिलो)

झेंडू – ४० ते ५०

सफेद शेवंती – ४०

पिवळी शेवंती – ६०

लाल, ब्राऊन शेवंती – ८० ते १००

गुलाब सुट्टे तुकडा – १५०

गुलाब बंच (५० फुले) – १०० ते १५०

निशिगंध / गुलछडी – १५०

जरबेरी जुडी – ८० ते १००

मोगरा – ७०० ते ८००

काकडा – ३००

जाई/ जुई – ८००

कण्हेर गुलाबी – ३००

सोनचाफा – १०० फुले – ३००

Thane News: ठाण्यात गणेशविसर्जनासाठी ४२ कृत्रिम तलाव, ‘या’ ठिकाणी करता येईल बाप्पांचं विसर्जन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here