प्रयागराज: ११ व्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. मुलीने शाळेतील शिक्षिकेचा नाचतानाचा व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट केला होता. असे केल्याने शिक्षिकेने मुलीला खूप रागावलं, त्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शाळा व्यवस्थापनाने कुटुंबीयांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिस आमचा एफआयआर लिहीत नसल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. ज्या शिक्षिकेचं स्टेटस मुलीने ठेवलं होतं त्या शिक्षिकेलाही भेटू दिलं जात नाही, असंही कुटुंबीय सांगत आहेत.

शहरातील एका प्रसिद्ध शाळेत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत शिकणारे विद्यार्थी आणि शाळेचे संपूर्ण शिक्षक कर्मचारीही शाळेत पोहोचले. कार्यक्रमात सर्वांनी डान्स केला. यावेळी इयत्ता ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने एका शिक्षिकेच्या डान्सचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

रात्री लावलेली लिपस्टिक सकाळी ओठांवरुन गायब कशी झाली, पतीचा सवाल अन् मग…
शाळेत शिक्षिकेने रागावले, विद्यार्थिनीने माफीही मागितली

यानंतर विद्यार्थिनीने शिक्षिकेच्या डान्सचा व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर जेव्हा विद्यार्थिनी शाळेत पोहोचली तेव्हा तिने तिच्या स्टेटसवर ज्या शिक्षिकेचा डान्स व्हिडिओ टाकला होता, त्या शिक्षिकेने विद्यार्थिनीला खडसावले. विद्यार्थिनीने तिला न विचारता स्टेटसवर डान्सचा व्हिडिओ कसा टाकला, यावर महिला शिक्षिका नाराज असल्याचं सांगण्यात आलं. या चुकीबद्दल विद्यार्थिनीने शिक्षिकेची माफीही मागितली होती.

त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी विद्यार्थिनीने घराच्या मागील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्षिकेने खडसावल्याने मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुलीला शाळेतून काढून टाकण्याची धमकीही देण्यात आली होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

तिच्या पेन्शनपायी पोलिसांना टेन्शन, नवऱ्याने पाच वर्ष बायकोची बॉडी फ्रीजमध्ये ठेवली
कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, जेव्हा आम्ही महिला शिक्षिकेला भेटण्यासाठी शाळेत पोहोचलो तेव्हा आम्हाला प्रवेश दिला गेला नाही. शाळा व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावले आणि आम्हाला तेथून काढले. त्याचवेळी कँट पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली असता आमचं त्यांनी ऐकलं नाही.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुलगी अभ्यासात खूप हुशार होती. पोलिसात भरती होण्याचं तिचं स्वप्न होतं. आई दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण बनवण्याचं काम करते आणि वडील बाटी-चोख्याचं दुकान चालवतात. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here