मुंबई: ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म महादेव बुक ऍपचा प्रमोटर सौरभ चंद्राकरचा लग्न सोहळा फेब्रुवारीत संयुक्त अरब अमिरातमध्ये संपन्न झाला. आलिशान सोहळ्याचा व्हिडीओ भारतीय यंत्रणांच्या हाती लागला आहे. त्या सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक कलाकार, गायक उपस्थित होते. त्यांनी त्या सोहळ्यात परफॉर्मन्सही दिला. या कलाकारांना ११२ कोटींपेक्षा अधिकची रक्कम हवालाच्या माध्यमातून देण्यात आली. या लग्न सोहळ्यावर तब्बल २०० कोटी रुपये खर्च करण्यातून आले होते.सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) मुंबई, भोपाळ, कोलकात्यातील हवाला ऑपरेटर्सवर छापे टाकले आहेत. याच ऑपरेटर्सनी या कार्यक्रमासाठी रक्कम मुंबईतील इव्हेंट कंपनीला पाठवली होती. लग्न सोहळ्याला गायिका नेहा कक्कर, गायक सुखविंदर सिंह, अभिनेत्री भारती सिंह आणि भाग्यश्री यांनी उपस्थिती लावली. त्या सोहळ्यात कला सादर करण्यासाठी त्यांना पैसेही देण्यात आले. यासोबतच बॉलिवूडमधील अनेक टॉपच्या कलाकारांनीदेखील लग्न सोहळ्यात परफॉर्मन्स दिला.महादेव बुक ऍप आणि सट्टेबाजीचं प्रकरण छत्तीसगडचं आहे. यामध्ये काही राजकारणी, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंधित लोकांचा समावेश आहे. सट्टेबाजीचा ऍपचा टर्नओव्हर २० हजार कोटींच्या घरात आहे. ईडीकडून मेसर्स महादेव ऑनलाईन बुक बेटिंग ऍपचा तपास करत आहे. या ऍपच्या माध्यमातून अवैध सट्टेबाजी करणाऱ्या संकेतस्थळांना ग्राहक पुरवले जायचे. यासोबतच हे ऍप यूजर आयडी तयार करुन आणि बेनामी बँक खात्यांमध्ये वेबच्या माध्यमातून पैशांची अफरातफर करणाऱ्या सक्षम ऑनलाईन प्लॅटफॉर्मची व्यवस्था करणाऱ्यांचं सिंडिकेट चालवायचं.ईडीनं नुकतेच कोलकाता, भोपाळ, मुंबईमध्ये छापे टाकले. महादेव ऍपशी संबंधित मनी लॉण्ड्रिंग नेटवर्कविरोधात व्यापक शोध मोहीम राबवण्यात आली. त्यांच्याविरोधात अनेक ठोस पुरावे हाती लागले आहेत. ईडीनं ४१७ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. छत्तीसगडच्या भिलाईमध्ये राहणारा सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे दोघे महादेव ऑनलाईन बुकचे मुख्य प्रमोटर असून ते दुबईतून सगळे व्यवहार पाहतात. त्यांचं मुख्य कार्यालय संयुक्त अरब अमिरातमध्ये आहे.यूएईमध्ये आयोजित लग्न सोहळ्यात परफॉर्मन्स देणाऱ्या कलाकारांची यादी-१. अतिफ अस्लम२. राहत फतेह अली खान३. अली असगर४. विशाल ददलानी५. ६. नेहा कक्कर७. एली अवराम८. भारती सिंह९. सनी लिऑन१०. भाग्यश्री११. पुल्कित१२. किर्ती खरबंदा१३. नुसरत भरुचा१४. कृष्णा अभिषेक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here