‘माझ्या अनुपस्थितीत माझं घर तोडणाऱ्या गुंडांना महापालिकेचं नाव देऊ नका. राज्यघटनेचा इतका मोठा अपमान करू नका,’ असं कंगनानं म्हटलं आहे. ‘बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारधारेवर शिवसेना उभी केली, ती विचारधारा विकून शिवसेना सत्तेसाठी ” झाली आहे, अशी टीका कंगनानं केली आहे.
‘तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती आणि वारसा देऊ शकतात, पण आदर-सन्मान तुमचा तुम्हालाच मिळवावा लागतो. माझं तोंड बंद कराल तर माझ्यानंतर लाखो मुखातून त्याचा प्रतिध्वनी उमटेल. तुम्ही किती तोंडं बंद करणार? किती जणांचे आवाज दाबणार? कधीपर्यंत तुम्ही सत्यापासून पळणार?,’ अशा प्रश्नांची सरबत्ती कंगनानं केली आहे. ‘तुम्ही आहात कोण? घराणेशाहीचा केवळ एक नमुना आहात,’ असा खोचक टोलाही कंगनानं उद्धव ठाकरे यांना हाणला आहे.
वाचा:
वाचा: वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times