अंतराळातून आलेली एक वस्तू थेट घरावर येऊन आदळल्याने एका महिलेला धक्का बसला. ते काय आहे हे महिलेला कळत नव्हते. मात्र, जेव्हा तिला कळालं की ती वस्तू काय आहे तेव्हा तिने संपूर्ण जगाला ते दाखवलं आहे. ही महिला रात्री आपल्या घरात झोपलेली असताना अचानक मोठा आवाज झाला, त्यामुळे ती झोपेतून खडबडून जागी झाली. तिला आकाशातून आगीचा गोळा तिच्या घराच्या दिशेने येताना दिसला. हे पाहून ती थरथर कापू लागली.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, ९ आणि १० सप्टेंबर रोजी येथे राहणाऱ्या शेकडो लोकांनी एक चमकणारी वस्तू आकाशातून पृथ्वीवर पडताना पाहिली होती. मात्र, या महिलेच्या घरात हा आगीचा गोळा येऊन पडला. ही रहस्यमय गोष्ट तिच्या घराच्या बागेत येऊन पडली होती. त्याचा मोठा आवाज झाला. महिलेने स्थानिक अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यावर, अंतराळ संशोधन संस्था FRIPON/Vigie-Ciel आणि Astronomical Society of France (SAF) ची टीम तपासणीसाठी तिच्या घरी पोहोचली. त्यांनी तपासले तेव्हा स्पष्ट झालं की आकाशातून घरात पडलेली ही विचित्र वस्तू ही उल्का होती.
SAF अध्यक्ष सिल्वेन बौली यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, ही बातमी मिळताच ते तात्काळ येथे आले. इथे पोहोचल्यानंतर जे काही दिसले त्यावर त्यांचा विश्वास बसेना. तेथे एक चमकदार वस्तू दिसली. आम्ही त्याची तपासणी केली तेव्हा आम्हाला कळले की ती उल्का होती. त्याचे वजन ०.७ किलो होते. घरात पडल्यावर त्या उल्केचे तीन तुकडे झाले होते. जेव्हा ते जमिनीवर आदळले तेव्हा ते ताशी शंभर मैल प्रति तासाच्या वेगाने आदळले.

सुदैवाने जिथे ही उल्का पडली तेव्हा तिथे कोणीही नसल्याने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. पण, यामुळे बागेतील टेबल तुटला. उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर जमिनीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच जळून जातात. फक्त पाच टक्के उल्का जमिनीवर पडतात. ही उल्का आगीच्या गोळ्याप्रमाणे दिसत असली तरी जेव्हा ती जमिनीवर पडते तेव्हा ती थंड झालेली असते. तापमानाच्या दृष्टीने याला डीप फ्राइड आइस्क्रीम म्हणतात.