पुणे : लग्न झाल्यानंतर सुनेचा सासूशी होणारा वाद काही नवीन नसतो, परंतु सासूचे टोमणे आणि छळ टोकाला गेले, की याचे परिणाम काय होऊ शकतात, याचं उदाहरण ही बातमी वाचून तुम्हाला कळेल. खडक पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने सासूच्या छळाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.

लग्नाच्या एका वर्षानंतर ही घटना घडली आहे. या प्रकरणी खडक पोलीस स्टेशने कारवाई केली असून आरोपी सासूवर गुन्हा दाखल केला आहे.

सायली सौरभ भागवत (वय २२, रा. दत्तवाडी, पुणे) असे या मयत झालेल्या सुनेचं नाव आहे. या प्रकरणी सासू राजेश्री राजेंद्र भागवत (साईबाबा मंदिर शेजारी, दत्तवाडी पोलीस चौकी) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवी अनिल अहिरे ( वय ३९, रा, हिराबाग पुणे) याने फिर्याद दिली आहे.

पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय, ५० वर्षीय वन कर्मचाऱ्याने जीव गमावला, २७ वर्षीय भाजी विक्रेत्याला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली सौरभ भागवत हिचा राजेश्री राजेंद्र भागवत हिच्या मुलाशी एका वर्षापूर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर सासू राजेश्री ही सायली हिला वारंवार टोमणे देऊन तिचा मानसिक छळ करायची. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन खालच्या पातळीचे शब्द प्रयोग सातत्याने करायची, असा आरोप आहे.

लक्ष्मी लॉजमध्ये ‘तसले’ प्रकार सुरु, पोलिसांना खबर लागली, छाप्यात ७३ वर्षीय आरोपीसह दोघं अटकेत
घटना घडली त्या दिवशी, सासू राजेश्री हिने हीन दर्जची वागणूक देऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिला तू झोपडपट्टीमध्ये राहणारी चिंधी चोर आहेस, तुला स्वयंपाक नीट बनवता येत नाही, असे म्हणत तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

बहिणींची भेट अखेरची, भाच्यासोबत बाईकने जाताना खड्ड्यात आदळून मावशी पडली, कारखाली चिरडून अंत
त्यासोबत सुनेला उपाशी पोटी ठेऊन, तिच्या नवऱ्यापासून अलिप्त राहण्यास भाग पाडले, तसेच तिला रात्री दोन वाजताच्या सुमारास घराबाहेर हाकलून दिले. या जाचाला कंटाळून सायली हिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या बाबत पुढील तपास खडक पोलीस स्टेशनचे पोलीस एल एन सोनवणे करत आहेत.

पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here