मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर शिवसेनेच्या रडारवर आली आहे. कंगना आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. कंगनानं शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर मुंबई महापालिकेनं बुधवारी तिच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामावर कारवाई केली. त्यामुळं संतापलेल्या कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. तसंच, बाबरा हे मंदिर पुन्हा उभं राहील, असं ती म्हणाली होती.
वाचा:
कंगनाच्या या भाषेला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी जोरदार आक्षेप घेतलाय. कंगना राणावत हिच्या प्रत्येक कृतीमागे भारतीय जनता पक्षच आहे, असा आरोप सावंत यांनी केला आहे. ‘तोंड कोणाचेही असले तरी शब्द भाजपचेच आहेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘काल भाजप पुरस्कृत एका चॅनेलने काही लोकांना जमवून निदर्शने करवणे, मोदी सरकारने कंगनाला तातडीने संरक्षण देणे, यातून सत्तापिपासू भाजपचे षडयंत्र स्पष्ट दिसत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. #महाराष्ट्रद्रोहीभाजपला महाराष्ट्र माफ करणार नाही. गद्दार भाजपा महाराष्ट्रातून साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times