हैद्राबाद: चोरी करण्यासाठी चोर काय करतील याचा काही नेम नाही. अशीच एक घटना तेलंगणामध्ये पाहायला मिळाली, जिथे एका व्यक्तीने महिलेचा वेष धारण करत दरोडा टाकला. पत्नीचा नाईट ड्रेस आणि विग घालून तो दुकानात आला आणि रोख रक्कम लुटली. मात्र, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला पकडलं.

तेलंगणातील राजन्ना-सिर्सिला जिल्ह्यातील येल्लारेड्डीपेट मंडल मुख्यालयात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगाराम गावात राहणारा गणगोनी बंटी येलारेड्डी पेट येथील एका इमारतीच्या खोलीत लक्ष्मी नारायण फ्लेक्सी प्रिंटिंगच्या नावाने व्यवसाय करतो. या इमारतीचा मालक रामिंदला नामपल्ली यांचा मुलगा रामिंदला सुधीर हाही आपल्या पत्नीसह तेथे राहतो. सुधीरला ड्रग्जचे व्यसन आहे आणि त्याच्याकडे त्याच्या गरजा भागवण्यासाठी पैसे नाहीत. यामुळे त्याने बंटीच्या दुकानातून चोरी करण्याचा निर्णय घेतला.

रात्री लावलेली लिपस्टिक सकाळी ओठांवरुन गायब कशी झाली, पतीचा सवाल अन् मग…
९ सप्टेंबर रोजी रात्री सर्व काम आटोपून बंटी दुकान बंद करून घरी गेला. तो गेल्यानंतर सुधीरने पत्नीचा नाईट ड्रेस आणि विग घालून मागील दाराने दुकानात प्रवेश केला आणि काउंटरमधून ३,५०० रुपये काढले आणि तेथून निघून गेला. ११ सप्टेंबर रोजी बंटीने दुकान उघडले असता पैसे गायब असल्याचं लक्षात आलं. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अन् अकरावीच्या विद्यार्थिनीने जीव गमावला, नेमकं प्रकरण काय?
सीसीटीव्ही फुटेजमुळे सारी घटना उलगडली

तपासादरम्यान, अधिकाऱ्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका महिलेने गुन्हा केल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. यानंतर सुधीरची चौकशी करण्यात आली. यावेळी पोलिसांना सुधीरवर संशय आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पकडले जाऊ नये म्हणून त्याने पत्नीचा विग आणि ड्रेस घातल्याचं सुधीरने सांगितले. पोलिस उपनिरीक्षक रमाकांत यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला कोठडीत पाठवण्यात आले आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here