नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यास पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहू नये, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा प्रखर इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासनाच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

रविवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. ७५ वर्ष पूर्ण झाल्याने मराठवाड्यातील आठ ही जिल्ह्यात मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जातं आहे. रविवारी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करुन हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले जाणार आहे. मात्र पालकमंत्र्याच्या हस्ते होतं असलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीला मराठा समाजाने विरोध दर्शविला आहे.

मराठवाडा निजामच्या राजवटी पासून मुक्त होऊन ७५ वर्ष होऊन गेले आहे, पण मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणाच्या जाचक अटीतून अजुनही मुक्त झाला नाही. मराठवाडा निजाम राजवटीत असताना कुणबी म्हणुन ओबीसी प्रवर्गात होता पण कालांतराने राजकीय कुरघोडीमुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून बाहेर फेकले गेले, आमचं हक्काचं आरक्षण आहे ते हक्काचं आरक्षण मागील साठ ते सत्तर वर्षांपासून आमचं राहिले नाही, असा दावा सकल मराठा समाजानं केला आहे.
पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काकांचे कार्यालय, शरद पवार डाव टाकणार
आरक्षण मिळवून देण्यासाठी लोकप्रनिधी देखील उदासीनता दाखवत आहेत. तेव्हा आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला परत मिळावं म्हणून मराठवाड्यातील मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मराठवाड्यातल्या एकाही जिल्ह्यात पालकमंत्री महोदयांनी ध्वजारोहण करू नये, कारण त्यांचा नैतिक अधिकार ते हिरावून बसलेत, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटींचं पॅकेज, मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय निधीची यादी वाचून दाखवली, जाणून घ्या सविस्तर
पहिले मराठा समाजाचे प्रश्न निकाली काढा आणि मगच सन्मानाने ध्वजारोहण करा, असं आव्हान सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने करण्यात आलं आहे. जर पालकमंत्री किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींच्या हाताने ध्वजारोहण झालेच तर अतिशय तीव्र आंदोलन छेडलं जाईल अशी भुमिका सकल मराठा समाज बांधवानी घेतली आहे.

Monsoon 2023 : राज्यात पुढचे पाच दिवस पावसाचे, विविध जिल्ह्यांना ऑरेंजसह यलो अ‍ॅलर्ट जारी, कुठं पाऊस पडणार?

सर्व राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी; इंदापुरातील पळसदेवमध्ये मराठा समाजाने घेतली भूमिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here